ETV Bharat / state

Rajesh Tope On Omicron Proliferation : ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव पाहता लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज - राजेश टोपे

ओमायक्रॉनची राज्यातील रुग्णसंख्या 10 झाली असून राज्यात आता काँटॅक्ट, ट्रेसिंग वाढवावी लागेल. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आलेल्या लोकांच्या संपर्कातील लोकांच्या RTPCR चाचणी घेण्याचे काम सुरू असून लसीकरण वाढवण्याची गरज ( Rajesh Tope on Vaccination in Jalna ) आहे. सध्या निर्बंध लावण्याची गरज नसून परिस्थिती पाहून त्यावर निर्णय होईल असेही टोपे यांनी सांगितले आहे.

Rajesh Tope on Vaccination in Jalna
राजेश टोपे
author img

By

Published : Dec 7, 2021, 7:23 PM IST

जालना - ओमायक्रॉनची राज्यातील रुग्णसंख्या 10 झाली असून राज्यात आता काँटॅक्ट, ट्रेसिंग वाढवावी ( Rajesh Tope On Omicron Proliferation ) लागेल. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आलेल्या लोकांच्या संपर्कातील लोकांच्या RTPCR चाचणी घेण्याचे काम सुरू असून लसीकरण वाढवण्याची गरज ( Rajesh Tope on Vaccination in Jalna ) आहे. सध्या निर्बंध लावण्याची गरज नसून परिस्थिती पाहून त्यावर निर्णय होईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात सांगितले आहे.

राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

चारशे प्रवर्गातील जागांवरील निवडणुकांना स्थगिती -

ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक स्थगित करून ओबीसींना आरक्षण मिळाल्यानंतर निवडणुका घ्यावा, यामुळे कुणावर अन्याय होणार नाही, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात म्हटले होते. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकांतील सुमारे चारशे प्रवर्गातील जागांवरील निवडणुकांना स्थगिती ( Election Commission Stay Local Body Election ) दिली.

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा मी आदर करतो. मात्र ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक स्थगित करावी त्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले आहे. न्यायिक पद्धतीने निवडणूका व्हाव्या असेही टोपे म्हणाले.

हेही वाचा - Stay on Local Body Election : ओबीसी प्रवर्गातील चारशे जागांवरील निवडणुकांना स्थगिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.