जालना : जिल्ह्यातील 5 नगर पंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला ( Local Body Election Result Jalna 2022 ) आहे. जालन्यातील लक्षवेधी असलेल्या घनसावंगी, तिर्थपुरी नगर पंचायतीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. घनसावंगी नगरपंचायतीत राष्ट्रवादीला 10 तर तिर्थपुरी नगर पंचायतीत 11 जागा मिळाल्या आहे. जाफ्राबाद नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी 6 जागेवर विजय मिळाला असून, अपक्षांना 4 तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे.
मंठा नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झालं असून, शिवसेनेचे 12 उमेदवार निवडून आले तर, भाजपचे केवळ 2 उमेदवार विजयी झाले आहेत. मंठा नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना धक्का बसला आहे. मंठा नगर पंचायत पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे. तर बदनापूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा वर्चस्व सिद्ध केलं आहे. या निवडणुकीत भाजपने 9, तर राष्ट्रवादीने 5 जागांवर विजय मिळवला आहे. बदनापूर नगर पंचायतीवर भाजप आमदार नारायण कुचे यांनी वर्चस्व मिळवलं असून, शिवसेनेला एकही जागा या नगरपंचायतीत मिळाली नाही. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांना हा मोठा धक्का समजला जातोय.
पक्षनिहाय विजयी झालेले उमेदवार
घनसावंगी नगर पंचायत निवडणूक २०२२ निकाल ( Ghansangavi Nagarpanchayat Election Result 2022 )
भाजप 0
शिवसेना 7
राष्ट्रवादी 10
काँग्रेस 0
इतर 0
मंठा नगर पंचायत निवडणूक २०२२ निकाल ( Mantha Nagarpanchayat Election Result 2022 )
भाजप 2
शिवसेना 12
राष्ट्रवादी 1
काँग्रेस 2
इतर 0
जाफ्राबाद नगर पंचायत निवडणूक २०२२ निकाल ( Jafrabad Nagarpanchayat Election Result 2022 )
भाजप 1
शिवसेना 0
राष्ट्रवादी 6
काँग्रेस 6
इतर 4
तिर्थपुरी नगर पंचायत निवडणूक २०२२ निकाल ( Tirthpuri Nagarpanchayat Election Result 2022 )
भाजप-2
शिवसेना-3
राष्ट्रवादी-11
काँग्रेस-1
इतर-0
बदनापूर नगर पंचायत निवडणूक २०२२ निकाल ( Badnapur Nagarpanchayat Election Result 2022 )
भाजप-9
शिवसेना -0
राष्ट्रवादी-5
काँग्रेस-1
इतर-2