ETV Bharat / state

जालना शहरात सर्वत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात - नवरात्र उत्सव

शहरात सर्वत्र उत्साहात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून घटस्थापना करण्यात आली आहे.

नवरात्र उत्सव
author img

By

Published : Sep 30, 2019, 3:38 AM IST

जालना - आदिशक्तीचा विशेषता महिलांचा उत्साहाचा असलेला नवरात्र उत्सव आजपासून सुरू झाला आहे. दरम्यान घरागुती घटस्थापने सोबतच सार्वजनिक मंडळांनी देखील वाजत गाजत देवींच्या मूर्तींची मिरवणूक काढून घटस्थापना केली आहे.

जालना शहरातील दृष्ये

शहर आणि परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत घटस्थापना सुरू होती. सायंकाळी पाच वाजेनंतर सार्वजनिक दुर्गा देवी मंडळांनी नियोजित करून ठेवलेल्या देवीच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढत नियोजित ठिकाणी गेल्या. दरम्यान, ढोल ताशाच्या गजरात आणि डीजेवरील गाण्यांच्या तालावर देवी भक्तांनी ठेका धरला होता. भव्य दिव्य मूर्ती विविध वाहनांमधून घेऊन जाताना देवी भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. शहरातही विविध ठिकाणी देवीच्या मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मस्तगडावर असलेल्या मंमादेवी मंदिराजवळ आराधी महिलाही स्थानापन्न झाल्या आहेत. कवड्यांची माळ, दुरडी आणि पीठा घेऊन या देवी भक्त नऊ दिवस मंदिराजवळच बसणार आहेत.
हेही वाचा - ...त्यामुळे गौतम बुद्ध जेवढे महत्वाचे तेवढेच छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज - खासदार संभाजीराजे

Intro:आदिशक्तीचा विशेषता महिलांचा उत्साहाचा असलेला नवरात्र उत्सव आजपासून सुरू झाला आहे .घरातील घटस्थापने सोबतच सार्वजनिक मंडळांनी देखील वाजत गाजत देवींच्या मूर्तींची मिरवणूक काढून घटस्थापना केली.

Body:जालना शहर व परिसरामध्ये रात्री दहा वाजेपर्यंत घटस्थापना सुरू होती. सायंकाळी पाच वाजेच्या नंतर सार्वजनिक दुर्गा देवी मंडळांनी नियोजित करून ठेवलेल्या देवीच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढत नियोजित ठिकाणी घेऊन गेले .ढोल ताशाच्या गजरात आणि डीजे वरच्या गाण्याच्या तालावर देवी भक्तांनी ठेका धरला होता. भव्य दिव्य मूर्ती विविध वाहनांमधून घेऊन जाताना देवी भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते .शहरातही विविध ठिकाणी देवीच्या मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मस्तगडवर असलेल्या मंमादेवी मंदिराजवळ आराधी महिलाही स्थानापन्न झाल्या आहेत. कवड्यांची माळ ,दुरडी,आणि पीठाघेऊन या देवी भक्त नऊ दिवस मंदिराजवळच बसणार आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.