ETV Bharat / state

राष्ट्रभक्ती नसल्यामुळेच काँग्रेस अडखळत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी - राष्ट्रभक्ती नसल्यामुळेच काँग्रेस अडखळत आहे

भाजप-सेना युतीची विजयाकडे घोडदौड सुरू असल्यानेच एवढा मोठा जनसमुदाय आज परतूर मध्ये जमला आहे. विरोधकांना या माध्यमातून पुन्हा एकदा युतीचे सरकार येणार असल्याचे ठणकावून सांगण्यासाठीच हे सर्व मतदार आले आहेत. असे मोदी म्हणाले.

राष्ट्रभक्ती नसल्यामुळेच काँग्रेस अडखळत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Oct 16, 2019, 10:24 PM IST

जालना - काँग्रेसची देशावरची राष्ट्रभक्ती संपली असून ज्यांची राष्ट्रावर भक्ती आहे, असे राजकीय नेते जनतेला पाहिजे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. देशाप्रती राष्ट्रभक्ती असलेल नेते काँग्रेसमध्ये नाहीत म्हणून आज काँग्रेस अडखळत असल्याचेही मोंदींनी म्हटले आहे. जालना आणि परभणी जिल्ह्यातील भाजप सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची परतूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

भाजप-सेना युतीची विजयाकडे घोडदौड सुरू असल्यानेच एवढा मोठा जनसमुदाय आज परतूर मध्ये जमला आहे. विरोधकांना या माध्यमातून पुन्हा एकदा युतीचे सरकार येणार असल्याचे ठणकावून सांगण्यासाठीच हे सर्व मतदार आले आहेत. असे मोदी म्हणाले.

हेही वाचा - भाजपच्या अंहकारी नेतृत्वाकडे मुळप्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याची किमया - शत्रुघ्न सिन्हा

यावेळी मोदी म्हणाले की, सध्याच्या काळात जनतेला संस्कृती टिकून ठेवणाऱ्या राजकारण्यांची गरज असून ती गरज युतीचे सरकार पूर्ण करत असल्याचा जनतेचा विश्वास आहे. म्हणूनच सर्व जनता आमच्या बाजूने आहेत. जे कोणी विरोधक राहिलेत ते 21 तारखेनंतर आमच्यासोबतच दिसतील. राज्यात मराठवाड्याच्या वाट्याला तीन वेळा मुख्यमंत्री पद मिळाले. मात्र, पाण्यासाठी जनतेला तडपावे लागत आहे. याची कसर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षातच भरून काढली.

हेही वाचा - प्रचारसभेची पातळी खालावली; हर्षवर्धन जाधव यांची शिवसेनेवर आक्षेपार्ह टीका

राष्ट्रवादीवर टीका करताना मोदी म्हणाले की, त्यांचे चिन्ह घड्याळ असून या घड्याळातील काटे दहावर असल्यामुळे फार तर त्यांचे दहा दहा उमेदवार निवडून येतील, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले. देशावर हल्ला केल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे सर्वत्र स्वागत झाले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने याला विरोध केला. त्यामुळे हा पक्ष कोणाच्या बाजूने आहे, हे सांगण्याची गरज नसल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा - '10 रुपयांत जेवणाची थाळी म्हणजे, शिवसेनेची मतांसाठी फसवाफसवी'

दरम्यान, या सभेला केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, यांच्यासह मेघना बोर्डीकर, हिकमत उढाण उपस्थित होते.

Intro:काँग्रेसची देशावर असलेली राष्ट्रभक्ती संपली आहे ,आणि जनतेला ज्यांची राष्ट्रावर भक्ती आहे असे राजकीय नेते पाहिजे आहेत ,आणि ते काँग्रेस मध्ये नाहीत म्हणून आज काँग्रेस लडखडत आहे तर भाजप-सेना युतीची विजयाकडे घोडदौड आहे त्यामुळेच एवढा मोठा जनसमुदाय आज परतूर मध्ये जमला आहे .आणि विरोधकांना या माध्यमातून पुन्हा एकदा युतीचे सरकार येणार असल्याचे ठणकावून सांगण्यासाठीच हे सर्व मतदार आले आहेत .असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले .परतूर विधानसभा मतदार संघात जालना व शेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील भाजप-सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

Body:या सभेला केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, नामदार अर्जुनराव खोतकर, यांच्यासह मेघना बोर्डीकर, हिकमत उढाण ,आदींची उपस्थिती होती .पुढे बोलताना मोदी म्हणाले की सध्याच्या काळात जनतेला रितीरिवाज आणि संस्कृती टिकून ठेवणाऱ्या राजकारण्यांची गरज आहे. आणि ती गरज युतीचे सरकार पूर्ण करत असल्याचा जनतेचा विश्वास आहे .म्हणूनच सर्वजण आमच्या बाजूने आहेत. आणि जे कोणी विरोधक राहिले आहेत ते 21 तारखेनंतर आमच्यासोबतच दिसतील .असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राज्यात मराठवाड्याच्या वाट्याला तीन वेळा मुख्यमंत्री पद मिळाले.मात्र पाण्यासाठी जनतेला तडपावे लागले. याची कसर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षातच काढून टाकली .राष्ट्रवादीवर टीका करताना ते म्हणाले की ,त्यांचे चिन्ह म्हणजे घड्याळ आहे आणि या घड्याळातील काटे दहावर असल्यामुळे फार तर त्यांचे दहा- दहा उमेदवार निवडून येतील असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले .
देशावर हल्ला केल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे सर्वत्र स्वागत झाले मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने याला विरोध केला. त्यामुळे हा पक्ष कोणाच्या बाजूने आहे हे सांगण्याची गरज नसल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.