ETV Bharat / state

Jalna Crime : झोपेतच असताना तरुणाचा खून; पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाजवळची घटना

जालना शहरात एका तरुणाची झोपेत असतानाच हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टीव्ही सेंटर भागातच ही खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडाली आहे.

Murder Of Young Man In Jalna
तरुणाचा खून
author img

By

Published : May 7, 2023, 4:14 PM IST

जालना: शहरातील सिरसवाडी रोडवरील टीव्ही सेंटर भागातील 40 वर्षीय प्रमोद झिने यांचा आज सकाळी झोपेतच खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. प्रमोद जनार्धन झिने हे आपल्या राहत्या घराच्या अंगणात रात्री झोपलेले होते. रात्रीतूनच मारेकऱ्यांनी झोपेत असलेल्या झिने यांच्यावर शस्त्राने वार करून मारहाण केली. आज सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत त्यांच्या नातेवाईकांना झिने यांचा मृतदेह आढळून आला.

पोलीस पथकाची घटनास्थळी भेट: या घटनेबाबत माहिती मिळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये, पोलीस उपनिरीक्षक हरीश राठोड, पोलीस उपनिरीक्षक वनवे, पोलीस हवालदार रामराव चापलकर, उदलसिंग जारवाल, वसंत धस, विलास आटोळे यांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी भेट दिली.

आरोपीचा शोध जारी: मयताचा मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणातील अज्ञात आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षकांच्या घराजवळ राहणाऱ्या भागात ही परिस्थिती असेल तर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची काय अवस्था असेल असा प्रश्न या हत्येमुळे उपस्थित केला जात आहे.

मित्रानेच केली मित्राची हत्या: बहिणीने राखी बांधल्यानंतर बहिणीसाठी मिठाई आणण्यासाठी गेलेल्या भावाची चाकूने हत्या करण्यात आली. ही घटना 3 फेब्रुवारी, 2023 रोजी नवी दिल्लीत घडली. मारेकरी हा मृताचा जवळचा मित्र असून बारावीतील मुलीच्या प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. 20 वर्षीय युवराज असे मृत मुलाचे नाव आहे. तो कस्तुरबा नगर परिसरात कुटुंबासह राहत होता. तो मुक्त विद्यालयातून बारावीत शिकत होता. शाहदरा जिल्ह्यातील विवेक विहार पोलीस ठाण्याने शवविच्छेदनानंतर युवराजचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. काही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहे.

प्रेमप्रकरणातून मुलाची हत्या: भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरात पुन्हा भर दिवसा खुनाचा तांडव पाहायला मिळाला. एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. सचिन मस्के असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रेमप्रकारणातू ही हत्या झाली असून संपूर्ण हत्याकांड सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. आरोपीची ओळख पटली असून, पोलीस यंत्रणा फरार आरोपीच्या मागावर आहे. लवकरच आरोपी पकडला जाईल असे पोलिसांनी सांगितले. मागील 4 महिन्यात प्रेम प्रकरणातून भर दिवसा हत्या होण्याची ही तुमसर शहरातील दुसरी घटना आहे.

हेही वाचा: Earthquake Near Koyna Dam : कोयना धरणाजवळ ३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; धरणापासून ५ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.