ETV Bharat / state

मराठी पत्रकार संघाची सहाय्यक पोलीस निरिक्षक विरुद्ध तक्रार - गुन्हेगार

जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने जाफराबाद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे.

पोलीस निरिक्षकाविरुद्ध तक्रार देताना पत्रकार
author img

By

Published : Feb 24, 2019, 12:15 AM IST

जालना - जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने जाफराबाद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जालना येथे येऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रारीचे निवेदन सादर केले.

जाफराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे हे पत्रकारांना आवश्यक ती माहिती देत नाहीत. त्यामुळे बातमी लिहिताना पत्रकारांना अडचणी येत असून जनतेसमोर खरी बातमी जात नाही. नुकत्याच झालेल्या शिवजयंती मिरवणुकीदरम्यान मारहाणीची गंभीर घटना घडल्यानंतरही याबाबतची कोणतीही माहिती पत्रकारांना दिली गेली नाही. उलट ही माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाय यांच्याकडे आहे, तेच सांगू शकतील असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र हा गुन्हा जाफराबाद पोलिस ठाण्यातच दाखल करण्यात आला आहे, असे आरोप निवेदनात करण्यात आले.

वरील आरोपाप्रमाणेच शांतता समितीच्या बैठकीत गुन्हेगार व अवैध धंदे करणारे व्यक्ती असतात. त्यामुळे पत्रकारांना हेतुपरस्पर बोलावले जात नाही. शहर व परिसरात वाळू तस्करी चोरटी वाहतूक, जुगार, मटका, अवैध दारू, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र, यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. तसेच पोलीस ठाण्याचा दूरध्वनीही कायमस्वरूपी बंद आहे. त्यामुळे पत्रकारांनी मिलिंद खोपडे यांना मोबाईल केल्यानंतर ते मोबाईल देखील स्वीकारत नाहीत. या सर्व बाबींची सखोल चौकशी करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

undefined
पोलीस निरिक्षकाविरुद्ध तक्रार देताना पत्रकार

निवेदनावर प्रकाश मिरगे,पांडुरंग राऊत, मोहन मुळे, शेख कदीर, चेतन बायस, सय्यद अय्युब, गजानन उदावंत, कैलास दिवटे, नितीन राऊत, प्राध्यापक वाहेद पटेल, शेख अब्दुल मतीन, उदय मुळे आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.

Intro:जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाफराबाद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जालना येथे येऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रारीचे निवेदन सादर केले.

Body:जाफराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे हे पत्रकारांना आवश्यक ती माहिती देत नाहीत, त्यामुळे बातमी लिहितांना पत्रकारांना अडचणी येत असून जनतेसमोर खरी बातमी जात नाही ,असा आरोप करून नुकत्याच झालेल्या दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंती मिरवणुकीदरम्यान मारहाणीची गंभीर घटना घडल्यानंतरही याबाबतची कोणतीही माहिती पत्रकारांना दिली गेली नाही. उलट ही माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाय यांच्याकडे आहे, तेच सांगू शकतील असे सांगण्यात आले .प्रत्यक्षात मात्र हा गुन्हा जाफराबाद पोलिस ठाण्यातच दाखल करण्यात आला आहे.

Conclusion:वरील आरोपाने प्रमाणेच शांतता समितीच्या बैठकीत गुन्हेगार व अवैध धंदे करणारे व्यक्ती असतात, त्यामुळे पत्रकारांना हेतुपुरस्सर बोलावल्या जात नाही. शहर व परिसरात वाळू तस्करी चोरटी वाहतूक ,जुगार, मटका ,अवैध दारू ,अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत .मात्र यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. तसेच पोलीस ठाण्याचा दूरध्वनीही कायमस्वरूपी बंद आहे. त्यामुळे पत्रकारांनी मिलिंद खोपडे यांना मोबाईल केल्यानंतर ते मोबाईल देखील स्वीकारत नाहीत. या सर्व बाबींची सखोल चौकशी करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर प्रकाश मिरगे ,पांडुरंग राऊत, मोहन मुळे ,शेख कदीर, चेतन बायस ,सय्यद अय्युब, गजानन उदावंत ,कैलास दिवटे, नितीन राऊत ,प्राध्यापक वाहेद पटेल ,शेख अब्दुल मतीन, उदय मुळे ,आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.