जालना : सहशिक्षिकेच्या सौंदर्याने घायाळ होऊन तिला अश्लील हावभाव (Obscene gesture to female teacher) करत तिच्याकडे शारीरिक सुखाची (demand of Sex from teacher) मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार बदनापूर शहरातील एका उर्दू माध्यमाच्या शाळेत घडला. (molestation case filed against teacher) 38 वर्षीय महिला शिक्षिकेशी सहशिक्षक वारंवार अश्लील हाव भाव करून गुप्त अंगाकडे इशारा करायचा. (Jalna Crime)
शिक्षिकेकडे भलतीच मागणी : तसेच तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करत होता. शाळेत एकटी असताना स्पर्श करत होता. गेल्या चार वर्षांपासून मानसिक त्रासात असलेल्या या महिला शिक्षिकेने याबाबत जिल्हा महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केली. नंतर महिला तक्रार निवारण समितीने ही तक्रार बदनापूर तालुका महिला निवारण समितीकडे चौकशीसाठी पाठवली. (Latest news from Jalna)
चौकशीत शिक्षकाचे कृत्य उघडकीस : बदनापूर तालुका महिला तक्रार निवारण समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा तक्रार निवारण समितीने केलेल्या चौकशीत शिक्षकाने महिला शिक्षिकेसोबत असभ्य वर्तणूक केल्याचे समोर आले. यानंतर समितीने महिला शिक्षकेला बदनापूर पोलिस ठाण्यात महिला अत्याचार अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेनंतर शिक्षिकेने बदनापूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे.
असल्या कृत्यांमुळे शिक्षक बदनाम : राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये Rajasthan Technical University डिसेंबर, 2022 मध्ये धक्कादायक प्रकरण समोर आला होता. जिथे प्राध्यापकाने विद्यार्थिनीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव demand girl student for physical relationship आणला होता. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून दादाबादी पोलिस ठाण्यात सहयोगी प्राध्यापक गिरीश परमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अब्दुल (नाव बदललेले) या विद्यार्थ्याच्या मदतीने प्राध्यापक काही विद्यार्थिनींवर संबंध ठेवण्यासाठी आणि चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्यासाठी दबाव आणत Teacher pressured to have sex होता. हा विद्यार्थी मध्यस्थ म्हणून काम करायचा.
आरोपीने अनेक विद्यार्थिनींना लक्ष्य केले: प्रकरणानुसार, विद्यार्थिनींचा आरोप केला होता की, सहयोगी प्राध्यापक गिरीश परमार याने अनेक विद्यार्थिनींना लक्ष्य केले होते. यासाठी अब्दुल विद्यार्थिनींना उत्तीर्ण होण्याच्या बहाण्याने घेऊन जातो. त्यानंतर आरोपीला असोसिएट प्रोफेसर परमार यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगतो. त्याच्यासोबतही असाच प्रकार घडला होता.
पीडित विद्यार्थिनी परीक्षेत नापास : तक्रारदार विद्यार्थिनीने सांगितले की, ती परीक्षेत नापास झाली होती आणि ती कधीही इंजिनीअरिंग पास होऊ शकणार नाही असेही सांगण्यात आले होते. विद्यार्थिनीने एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की, या घटनेमुळे ती खूप दुखावली गेली आहे. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आणि आत्महत्येसारखे पाऊल उचलण्याचा विचार करू लागली. मात्र, इतर मित्रांशी बोलल्यावर तिने हिंमत दाखवली आणि कुटुंबीयांशी बोलून हा गुन्हा दाखल केला.
विद्यार्थिनींना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला : राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, अब्दुल हा देखील वर्गाचा प्रतिनिधी आहे. तसेच कोविड-19 च्या काळात जेव्हा ऑनलाइन वर्ग सुरू होते. मग हे संपूर्ण काम पाहत होते. अशा परिस्थितीत गिरीश परमार याने यातून संपूर्ण कट रचून अनेक विद्यार्थिनींना अडकवण्याचा प्रयत्न केला.