जालना - कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातले आहे. त्यामुळे, सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशात सर्व कामेही बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा गरजूंच्या मदतीला भाजपा जालना जिल्हाध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे धावून आले आहेत.
दानवे यांच्याकडून गरजू कुटुंबांना मोफत गहू, तांदुळ, साखर, तेल, मीठ, डाळ, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी नगसेवक दिपक बोर्डे, रणवीरसिंह देशमुख, आशाताई माळी, मुकेश चिणे यांची उपस्थिती होती.