ETV Bharat / state

Shashan Aaplya Dari: शासन आपल्या दारी योजनेची आमदाराकडून पोलखोल; महिलांकडून फाॅर्मसाठी घेतले पैसे - महिलांकडून फाॅर्मसाठी घेतले पैसे

सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावे यासाठी शासन थेट जनतेच्या दारी ही योजनी आहे. तर या कार्यक्रमाची भाजप आमदार नारायण कुचे यांच्याकडून पोलखोल करण्यात आली आहे. तर या योजनेची पोलखोल भाजप आमदारानेच केल्याने खळबळ उडाली आहे.

MLA Narayan Kuche
आमदार नारायण कुचे
author img

By

Published : May 19, 2023, 11:00 PM IST

Updated : May 20, 2023, 3:19 PM IST

जालना : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ 13 मे रोजी सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला आहे.

कीट घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी: शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची भाजप आमदार नारायण कुचे यांच्याकडून पोलखोल करण्यात आली. जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये आज शासन आपलया दारी योजनेचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कामगार कल्याण विभाकडून कीट घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला भाजप आमदार नारायण कुचे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

शासन आपल्या दारी कार्यक्रमाची पोलखोल: एका कीटसाठी महिलांकडून फाॅर्मसाठी ७०० रुपये तर कीटचे दीड हजार रुपये घेतले, असल्याचे महिलांनी कुचे यांच्यासमोर सांगितले. दरम्यान आमदार कुचे यांनी या संपूर्ण घोटाळ्याची शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची पोलखोल केल्याने, कामगार कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. कामगार कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असा दम कुचे यांनी अधिकाऱ्यांना भरला.

काय आहे योजना?: राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी या अभियानाचे प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुकास्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. तर राज्यातील सर्वसामान्य शेतकरी, जनता, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis आदळ आपट करण्यापेक्षा निकालाचे स्वागत करावे खोतकर यांचा विरोधकांना सल्ला
  2. Jalna Crime पत्नी व प्रियकराच्या संबंधात पती ठरला व्हिलन दोघांनी केला त्याचा गेम
  3. Hanuman Jayanti 2023 पंचक्रोशीत एकही नाही बजरंगबलीचे मंदिर येथे होते जाम्बुवंताची पूजा

Last Updated : May 20, 2023, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.