जालना - बदनापूर तालुक्यात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन मागील एक वर्षापासून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव केदारनाथ राधाकिशन ढाकणे (वय 22) असे असून याप्रकरणी बदनापूर पोलिसांना आरोपी विरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - आदिवासी अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोन आरोपींना तीन वर्षाचा तुरुंगवास
बदनापूर तालुक्यातील इयता बारावी शिकणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातीलच केदारनाथ ढाकणे या तरुणाने मागील एक वर्षांपासून तिला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन, तिच्यावर बळजबरीने अनेक वेळा अत्याचार केल्याची तक्रार पीडित मुलीच्या भावाने बदनापूर पोलीस ठाण्यात 9 जानेवारीला दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.