ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; आरोपीला पकडण्यात पोलिसांची टाळाटाळ - परतूर मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना परतूर येथे घडली. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पळवून नेणाऱ्या आरोपीच्या नावासह तक्रार दाखल केली. मात्र, तरीही पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन आपली तक्रार दिली.

अपहरण
अपहरण
author img

By

Published : Feb 7, 2020, 10:14 PM IST

जालना - अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना परतूर येथे घडली. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीचे नावही पोलिसांना सांगण्यात आले. तरीही पोलिसांनी आरोपीला पकडण्यात टाळाटाळ केली. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन आपली तक्रार दिली.

अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांची टाळाटाळ

16 जानेवारीला बाहेरची कामे करून घरी आल्यानंतर मुलीच्या आईला पंधरा वर्षाची मोठी मुलगी दिसली नाही. तेव्हा तिचा शोध घेत असताना गल्लीतील मुलगा नसीर उर्फ नसीम काजी हा त्या मुलीला जबरदस्तीने ओढून तिचा विनयभंग करताना दिसून आला. त्यावेळी त्याला पकडून मुलीच्या समाजातील लोकांनी मारहाण केली. त्यावेळी त्याने जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिली.

हेही वाचा - बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींना पाकिस्तान सार्वजनिकरित्या फाशी देणार

त्यानंतर प्रतिष्ठेमुळे मुलीच्या घरच्यांनी याबाबत काही कार्यवाही केली नाही. मात्र, तेव्हापासून आरोपी वारंवार घरासमोर येऊन मुलीला खुणावत असे. 31 जानेवारीच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास मुलगी शौचासाठी बाहेर गेली. बराच वेळ होऊनही ती परत न आल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी बाहेर जाऊन पाहिले. तेव्हा नसीर उर्फ नसीम काजी हा मोटरसायकलवरून तिला पळवून नेताना दिसला. मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मुलीला पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने परतूर पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी कलम 354, 363, 366 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, आरोपीचे नाव देऊनही पोलिसांनी काहीच दखल न घेतल्यामुळे मुलीच्या समाजाच्यावतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

Intro:अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना परतूर येथे घडली20 दिवसापूर्वी घडली आहे. मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ही पोलिसांनी आरोपीला पकडण्यात टाळाटाळ केल्यामुळे पारधी समाजाच्या नागरिकांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली.

Body:यासंदर्भात मुलीची आई देवकाबाई अनिल काळे 35 रा. पारधी वाडा परतूर. यांनी परतूर पोलीस ठाण्यात दिनांक 31 जानेवारी रोजी परतूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपण पती अनिल काळे दोन मुले आणि मोठी मुलगी असे पारधी वाडा येथील पारधी वाडा येथे राहतो आणि घर काम करतो, 16 जानेवारीला बाहेरची कामे करून घरी आल्यानंतर पंधरा वर्षाची मोठी मुलगी दिसली नाही. तेव्हा तिचा शोध घेत असताना गल्लीतील नगरपालिकेत पाणी सोडण्याचे काम करणाऱ्या चा मुलगा नसीर उर्फ नसीम काजी हा माझ्या मुलीला जबरदस्तीने ओढून तिचा विनयभंग करताना दिसून आला. त्यावेळी त्याला पकडून समाजातील लोकांनी मारहाण केली. त्यावेळी त्याने जातीवाचक शिवी देऊन बघून घेण्याची धमकीही दिली. त्यानंतर प्रतिष्ठेमुळे आम्ही पुढे काहीही कार्यवाही केली. नाही तेव्हापासून तो वारंवार घरासमोर येऊन मुलीला खुणावत होता ,आणि त्रास देत होता. दिनांक 31 जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुलगीशौचालयाला बाहेर गेली आणि बराच वेळ ती न आल्यामुळे आम्ही घराच्या बाहेर जाऊन पाहिले असते नसीर उर्फ नसीम काजी मोटरसायकलवरून तिला पळवून नेताना दिसला.सदर मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवण्याकरिता आमच्या ताब्यातून तिला पळवून नेले आहे .
अशी तक्रार मुलीच्या आईने परतूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी कलम 354, 363, 366 ,अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान आरोपीचे नाव देऊनही पोलिसांनी काहीच दखल न घेतल्यामुळे आज आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी पूर्ण पारधी समाज आला होता. यामध्ये गिताबाई राधाकिसन चव्हाण, सोनाबाई आसाराम चव्हाण, सीताबाई पवार, जालिंदर रामा चव्हाण, रमेश बाजीराव पवार, शामराव काळे, यांचा समावेश होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.