ETV Bharat / state

जालन्यात आठ दिवसांपासून रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी - जालना बातमी

नव्या जालन्यातून जुना जालन्यात येणाऱ्या पुलाच्या बाजूला गेल्या आठ दिवसांपासून जलवाहिनी फुटली आहे. ही जलवाहिनी दुरुस्त करण्याऐवजी तिच्यावर पत्रा लावून उंच उडणारे फवारे नगरपालिकेने थांबविले आहेत. परंतु, अत्यंत उच्च दाबाने येणारे हे पाणी लांबपर्यंत जात आहे. आधीच खड्डे असलेल्या रस्त्यावर या जलवाहिनीचे पाणी साचल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पाण्याची नासाडी
author img

By

Published : Sep 5, 2019, 11:23 PM IST

जालना - पावसाअभावी जिल्ह्यामध्ये दुष्काळाचे सावट पसरलेले असताना नगरपालिका मात्र पाण्याची नासाडी करीत आहे. फुटलेल्या जलवाहिनीला पत्रा लावून उडणारे कारंजे तर थांबविले. मात्र, वाहत जाणारे पाणी थांबवण्याची गरज येथील नगरपालिकेला वाटत नाही. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून रोज लाखो लिटर पाणी नदीपात्रात वाहत जात आहे.

पाण्याची नासाडी

हेही वाचा-शस्त्र तस्करांची पोलिसांसोबत फिल्मी स्टाईल झटापट; एसआरपीएफच्या जवानासह ६ जणांवर गुन्हा

नव्या जालन्यातून जुना जालन्यात येणाऱ्या पुलाच्या बाजूला गेल्या आठ दिवसांपासून जलवाहिनी फुटली आहे. ही जलवाहिनी दुरुस्त करण्याऐवजी तिच्यावर पत्रा लावून उंच उडणारे फवारे नगरपालिकेने थांबविले आहेत. परंतु, अत्यंत उच्च दाबाने येणारे हे पाणी लांबपर्यंत जात आहे. आधीच खड्डे असलेल्या रस्त्यावर या जलवाहिनीचे पाणी साचल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

जालना शहर वगळता जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची आजही भीषण टंचाई आहे. अशा परिस्थितीमध्ये जालना नगरपालिकेने पाण्याची बचत करण्यासाठी कोणतीही उपाययोजना न करता उलट फुटलेल्या या जलवाहिनीचे पाणी नदीपात्रात काढून दिले आहे. यावेळीच्या पावसाने कुठल्याही जलस्त्रोताच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही, असे असताना जालना शहराला मुबलक पाणी मिळत आहे. मात्र, हे पाणी योग्य कारणासाठी न वापरता फुटलेल्या जलवाहिनीतून वाहून जात आहे. नियोजनाअभावी नागरिकांना भर पावसाळ्यात देखील 10 ते 12 दिवसांनी पाणी मिळत आहे.

Intro:पावसाअभावी जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळाचे सावट पसरलेले असताना जालना नगरपालिका मात्र पाण्याची नासाडी करीत आहे .फुटलेल्या जलवाहिनीला पत्रा लावून उडणारे कारंजे तर थांबविले ,मात्र वाहत जाणारे पाणी थांबवण्याची गरज जालना नगरपालिकेला वाटत नाही .त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून रोज लाखो लिटर पाणी नदीपात्रात वाहत जात आहे.

Body:नव्या जालन्यातून जुना जालन्यात येणाऱ्या पुलाच्या बाजूला गेल्या आठ दिवसांपासून जलवाहिनी फुटली आहे, ही जलवाहिनी दुरुस्त करण्याऐवजी तिच्यावर पत्रा लावून उंच उडणारे फवारे नगरपालिकेने थांबविले आहेत. परंतु अत्यंत उच्च दाबाने येणारे हे पाणी लांब पर्यंत जात आहे. आधीच खड्डे असलेल्या रस्त्यावर या जलवाहिनीचे पाणी साचल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे जालना शहर वगळता जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची आजही भीषण टंचाई आहे. अशा परिस्थितीमध्ये जालना नगरपालिकेने पाण्याची बचत करण्यासाठी कोणतीही उपाययोजना न करता उलट फुटलेल्या या जलवाहिनीचे पाणी नदीपात्रात काढून दिले आहे. कुठल्याही जलस्त्रोत यामध्ये पाणीसाठ्याची वाढ झाली नाही असे असताना जालना शहराला मुबलक पाणी मिळत आहे .मात्र हे पाणी योग्य कारणासाठी न वापरता फुटलेल्या जलवाहिनीतून वाहून जात आहे. नियोजनाअभावी नागरिकांना भर पावसाळ्यात देखील 10 ते 12 दिवसांनी पाणी मिळत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.