ETV Bharat / state

CORONA : 'आवश्यकता भासल्यास नर्सिंग कॉलेजच्या परिचारिका आणि खाजगी डॉक्टरांना देखील घेणार सेवेत'

author img

By

Published : Mar 21, 2020, 5:11 PM IST

जालना जिल्ह्यात आरोग्य सेवेसाठी शासकीय यंत्रणेतील मनुष्यबळ कमी पडू शकेल. अशा वेळी शेजारच्या जिल्ह्यातून मनुष्यबळ मागवावे. तसेच जिल्ह्यामध्ये असलेल्या नर्सिंग महाविद्यालयातील परिचारिका तसेच खाजगी डॉक्टर्स यांना देखील सेवेमध्ये पाचारण करावे, असे आवाहन डॉ. मुजीब सय्यद यांनी यावेळी केले.

corona virus
कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

जालना - जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. आज (शनिवार) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक पार पडली. जिल्ह्यात आरोग्य सेवेसाठी शासकीय यंत्रणेतील मनुष्यबळ कमी पडेल, अशा वेळी शेजारच्या जिल्ह्यातून मनुष्यबळ मागवावे. तसेच जिल्ह्यामध्ये असलेल्या नर्सिंग महाविद्यालयातील परिचारिका तसेच खाजगी डॉक्टर्स यांना देखील सेवेमध्ये पाचारण करावे, असे आवाहन डॉ. मुजीब सय्यद यांनी यावेळी केले.

कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न...

जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रीना बसय्ये, यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी असे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी औरंगाबाद येथील डॉ. मुजीब सय्यद यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि कोरोना विषाणू व आजाराबाबत माहिती दिली.

हेही वाचा... मुंबई, पुणे, नागपूरमध्ये आजपासून सक्तीची बंदी; रस्त्यांवर शुकशुकाट

बाहेरील देशातून आलेल्या नागरिकांच्या हातावर ठसे मारणे, त्यांच्यावर चौदा दिवस निगराणी ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कामात किंवा अशा प्रकारच्या प्रकरणात कोणताही नागरिक प्रतिसाद देण्यास हयगय करत असेल तर त्याच्यावर पोलीस कारवाई करावी, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच अशा नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणेतील मनुष्यबळ कमी पडेल, अशा वेळी शेजारच्या जिल्ह्यातून मनुष्यबळ मागवावे. तसेच जिल्ह्यामध्ये असलेल्या नर्सिंग महाविद्यालयातील परिचारिका तसेच खाजगी डॉक्टर्स यांना देखील सेवेमध्ये पाचारण करावे, असे आवाहन डॉ. मुजीब सय्यद यांनी यावेळी केले. नियोजन सभेतील उपस्थितांना सभागृहामध्ये स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.