ETV Bharat / state

जालन्यात लसीकरण केंद्रासमोर रांग, लस न मिळाल्याने नागरिक संतप्त - तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल सोनी न्यूज

कालपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. जालना जिल्ह्यातही तरूणांनी लसीसाठी रांगा लावल्या. पण काहींना लस मिळाली नाही. त्यामुळे ते संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, लसीसाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

jalna
जालना
author img

By

Published : May 2, 2021, 8:51 PM IST

Updated : May 3, 2021, 7:43 AM IST

जालना - राज्य सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्यास कालपासून (1 मे) सुरुवात केली आहे. जालना जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी ही लस देण्यात येणार आहे. त्यापैकी जालना शहरात पाणीवेस भागामध्ये शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस दिली जात आहे. या केंद्रावर तरुणांनी रांगा लावल्या. मात्र, लस मिळत नसल्यामुळे ते संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

जालन्यात लसीकरण केंद्रावर रांग

पूर्वनोंदणी आवश्यक

शासनाने ठरवून दिलेल्या अ‍ॅपमध्ये नागरिकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसारच या केंद्रांवर लस मिळणार आहे. मात्र, नोंदणी करूनही काहीच उत्तर न आल्यामुळे नागरिकांनी आज (2 मे) या लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. दरम्यान, लसीकरणाचा आज दुसरा दिवस आहे. फक्त दीड हजार जणांनाच लस या केंद्रावर पुढील सहा दिवसांमध्ये मिळणार आहेत.

ॲपमध्ये गडबड

लस मिळावी म्हणून ज्या ॲपमध्ये नाव नोंदणी करायचे आहे, त्या ॲपमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे नोंदणी करणारे गोंधळून गेले आहेत. रेल्वेच्या रिझर्वेशनप्रमाणे वारंवार हे ॲप उघडून त्यामध्ये ही लस कधी उपलब्ध होणार आहे? हे आधी पाहावे लागणार आहे. त्यानुसार आपल्याला वेळ घ्यावी लागणार आहे. त्यासाठी नागरिकांना वारंवार या अ‍ॅपच्या संपर्कात राहावे लागणार आहे.

जालना जिल्ह्यात या 5 केंद्रांवर मिळणार लस

1. पाणीवेस भागातील नगरपालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
2. ग्रामीण रुग्णालय भोकरदन
3. ग्रामीण रुग्णालय घनसावंगी
4. ग्रामीण रुग्णालय परतुर
5. उपजिल्हा रुग्णालय अंबड

12 कर्मचारी कार्यरत

शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र जालना येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शितल सोनी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोनवणे, डॉक्टर कविता दायमा, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश काळे यांच्यासह अन्य कर्मचारी असे एकूण 12 कर्मचारी कार्यरत आहेत.

'पूर्वनोंदणी करून वेळ घ्यावी'

'रोज 200 याप्रमाणे 7 दिवस हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पुढील लस कधी येईल हे माहीत नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येण्यापूर्वी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. लसीकरणाच्या ठिकाणी कसल्याही प्रकारची नोंदणी केली जात नाही', असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल सोनी यांनी सांगितले आहे.

'नोंदणी करणारेच आले नाहीत'

'ज्या नागरिकांनी नोंदणी केली होती. त्यांना वेळ देण्यात आली होती. पण त्यापैकी काहीजण आले नाहीत. तर, दुसरीकडे ज्यांनी नोंदणी केली नव्हती, ते केंद्रावर लसीसाठी आले होते. पण आम्हाला त्यांना लस देता आली नाही. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केली आहे आणि ज्यांना लसीकरणासाठी तारिख-वेळ मिळाली आहे. त्यांनीच केंद्रावर लसीकरणासाठी यावे', असेही शितल सोनी यांनी म्हटले.

हेही वाचा - 'कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काँग्रेसने निवडणुकांकडे लक्ष दिलं नाही'

हेही वाचा - राज्यातील कारागृहात 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ; 9 कैदी, तर 9 कारागृह कर्मचाऱ्यांचा समावेश

Last Updated : May 3, 2021, 7:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.