ETV Bharat / state

एक तारखेनंतर लागू शकते टाळेबंदी, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे सूतोवाच - जालना जिल्हा बातमी

जालन्यात टाळेबंदी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एख एप्रिलनंतर कधीही टाळेबंदी होण्याची शक्यता आहे, असे सूचक वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आङे.

उद्घाटन करताना
उद्घाटन करताना
author img

By

Published : Mar 28, 2021, 3:42 PM IST

Updated : Mar 28, 2021, 4:58 PM IST

जालना - जालन्यात टाळेबंदी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक एप्रिलनंतर कधीही टाळेबंदी लागू शकते, असे सूचक विधान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. जालना जिल्हा परिषदेला राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत दोन मोबाईल मेडीकल युनिट व्हॅन देण्यात आल्या आहेत. याचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज (दि. 28 मार्च) झाला. त्यावेळी ते बोलत होते.

बोलताना आरोग्यमंत्री

टाळेबंदीचा विचार

साध्य परिस्थितीत सर्व जिल्हाधिकार्‍यांना स्थानिक पातळीवरील परिस्थिती हाताळण्यासाठी टाळेबंदीचा विचार करावा लागत आहे. मात्र ती योग्य नाही सर्वांनी एकाच वेळी केले तर त्याचा योग्य परिणाम होऊ शकतो. आणि ते देखील पंधरा दिवसांचे असावे .यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहोत आणि एक तारखेनंतर यावर निर्णय होईल. तसेच जालन्यात देखील टाळेबंदी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भातील निर्णय प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून घेतल्या जाईल. कदाचित एक तारखेनंतर याची अंमलबजावणी देखील होऊ शकते, असे सुतोवाच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यासाठी फायदा व्हावा या उद्देशाने जालना जिल्हा परिषदेला फिरत्या मोबाईल व्हॅन देण्यात आले आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा आज झाला. यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे व्यवस्थापक रावसाहेब शेळके यांची यावेळी उपस्थिती होती.

हेही वाचा - लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी पुरेसा वेळ देऊ- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे

Last Updated : Mar 28, 2021, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.