जालना Manoj Jarange News- गावकऱ्यांना विचारून निर्णय घेणार आहे. महिलांवर अत्याचार करणारे निलंबित होणार आहेत. पहिल्यांदाच सर्वपक्षीय बैठक झाली असून 40 वर्षानंतर मराठा आरक्षण आंदोलन अंतिम टप्प्यात आलय. सरकारला वेळ दिला तरी आंदोलन सुरुच राहणार आहे. ४० वर्षे दिले आता एक महिना आणखी देऊन पाहणार आहोत. माझ्यावर शंका घेऊ नका, आंदोलन संपवलं तर आपल्याला गुंडाळून टाकतील. जागा सोडणार नाही. जात बदनाम होऊ नये म्हणून माघार घेत आहे. मी आरक्षणाच्या मागणीवर ठाम असून माझ्यावर विश्वास ठेवा. राज्यभरात अहिंसक आंदोलन करा. आरक्षणाचं पत्र मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी जाहीर केलीय.
एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची यात्रा- मराठा आरक्षण आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेणे आणि अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा निर्णय झाला आहे. परंतु आरक्षणाचा विषय राहिला आहे. सर्वपक्षीयांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यास पाठिंबा दिला आहे. आपल्याला कायम टिकणारे आरक्षण हवं आहे. आरक्षणाच्या कायद्याची प्रक्रिया मोठी आहे. अभ्यासक आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यासाठी वेळ द्यावा लागतो.
आपण शासनाला एक महिन्याचा वेळ देऊ. परंतु आरक्षण मिळेपर्यंत आपण ही जागा सोडणार नाही. ३१ व्या दिवसानंतर आरक्षण मिळालं नाही, तर महाराष्ट्राची बॉर्डर एकाही मंत्र्याला क्रॉस करू देणार नाही. एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची यात्रा निघेल-आंदोलक मनोज जरांगे
या आहेत अटी- अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी उपस्थित समाज बांधवांनी हातवर करून समर्थन दिले. त्यानंतर जरांगे यांनी पाच अटी ठेवल्या. समितीचा अहवाल कसाही येवो ३१ व्या दिवशी महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाज बांधवांना प्रमाणपत्र वाटप करायचे. राज्यात दाखल झालेले मराठा आरक्षणातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. लाठीमार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करावे. उपोषण सोडायला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, छत्रपती संभाजी राजे भोसले, उदयनराजे भोसले यांनी यावे. सरकारने सर्व लेखी द्यावे हे मुद्दे जरांगे यांनी उपोषणाच्या अटी घातल्या आहेत.
काल बैठकीत काय घडलं?
सोमवारी रात्री सह्याद्री येथे सर्वपक्षीय बैठकीत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, असा ठराव झाला. बैठक सुरू असतानाच संभाजीराजे बाहेर पडले होते. त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी मराठा समाज हा मागास असल्याचे सिद्ध करण्याची गरज व्यक्त केली. तसचं सर्वपक्षीय बैठक घेण्यासाठी दीड वर्षे का वेळ लावला, असा प्रश्न उपस्थित केला. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाकरिता थोडा वेळ द्यावा, असं म्हटलं. तसंच जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी असल्याचं म्हटलं. दुसरीकडे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षणाच्या समितीवर अजित पवार यांची नियुक्ती करावी, अशी सर्वपक्षीय बैठकीत मागणी केली.
सकाळपासून काय घडलयं.
- राज्यमंत्री संदिपान भुमरे आणि जालन्यातील शिवसेना नेते ( शिंदे गट) अर्जुन खोतकर यांनी जरंगे यांची भेट घेऊन सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या ठरावांची माहिती दिली. सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या ठरावांची माहिती दिली.
- संभाजी भिडे यांनीही जरंगे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं.
- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर राज्य सरकारकडून निर्णय जाहीर न झाल्यानं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जरंगे यांनी स्पष्ट केलं.
- उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली असून ग्रामस्थांकडून उपोषण सोडण्याची विनंती करण्यात येत आहे.
हेही वाचा-