जालना - विद्युत मीटरचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे घडली आहे. शेतातून घरी आल्यानंतर घरातील वीज नसल्याने मीटर तपासण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय तरुणाला शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव समाधान भागाजी नरवाडे असे आहे.
सध्या शेती कामाला शेतकऱ्यांनी वेग दिला आहे. समाधान हा देखील शेतात आपल्या कुटुंबासोबत दिवसभर काम करुन सायंकाळी घरी आला. मात्र घरातील लाईट नसल्याने समाधानने घरातील मीटर तपासण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मीटरचा शॉक लागून समाधानचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानतंर पत्नी व नातेवाईक धावत आले. त्यांनी घरातील लाईट बंद केली. माञ तोपर्यंत समाधानचा मृत्यू झाला होता. पुढील तपासणीसाठी मृताला पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.