ETV Bharat / state

'महावितरण'चा भोंगळ कारभार..! शेतात वीज जोडणीच नाही, तरीही पाठवले ३० हजारांचे बिल - mseb connection news

अंबड तालुक्यातील आलमगाव येथील सविता प्रल्हाद बर्गे यांनी, 16 डिसेंबर 2011 ला शेतीसाठी वीज जोडणी मिळावी, यासाठी 4 हजार 750 रुपयांचे कोटेशन वीज मंडळाकडे भरले. अद्यापपर्यंत त्यांना वीज जोडणी करुन मिळालेली नाही. त्यांनी याबाबत वारंवार अंबाड उपविभागात पाठपुरावा केला. तरीदेखील त्यांची दखल घेण्यात आली नाही. पण वीज मंडळाने 27 जानेवारी 2020 ला सविता यांना वीज बिल पाठवून दिले. हे बिल तब्बल तीस हजाराचे आहे. शेतामध्ये वीज जोडणीच नसताना, तीस हजाराचे बिल आल्याने, सविता यांना धक्काच बसला.

mahavitaran sent 30 thousand bill to farmer without connection
'महावितरण'चा भोंगळ कारभार..! शेतात वीज जोडणीच नाही, तरीही पाठवले ३० हजारांचे बिल
author img

By

Published : Jun 22, 2020, 10:56 AM IST

Updated : Jun 22, 2020, 11:31 AM IST

जालना - वीज महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. 2011 मध्ये अंबड तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याने नियमानुसार, कोटेशन भरून शेतीसाठी विजेची मागणी केली होती. वीज जोडणी तर आत्तापर्यंत मिळालीच नाही, पण महावितरणाने तीस हजारांचे बिल मात्र त्या महिला शेतकरीला पाठवले आहे. महावितरणाचे बिल पाहून त्या महिला शेतकरीला धक्काच बसला.

अंबड तालुक्यातील आलमगाव येथील सविता प्रल्हाद बर्गे यांनी, 16 डिसेंबर 2011 ला शेतीसाठी वीज जोडणी मिळावी, यासाठी 4 हजार 750 रुपयांचे कोटेशन वीज मंडळाकडे भरले. अद्यापपर्यंत त्यांना वीज जोडणी करुन मिळालेली नाही. त्यांनी याबाबत वारंवार अंबाड उपविभागात पाठपुरावा केला. तरीदेखील त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. पण वीज मंडळाने 27 जानेवारी 2020 ला सविता यांना वीज बिल पाठवून दिले. हे बिल तब्बल तीस हजाराचे आहे. शेतामध्ये वीज जोडणीच नसताना, तीस हजाराचे बिल आल्याने, सविता यांना धक्काच बसला.

अधिक माहिती देताना आमचे प्रतिनिधी दिलीप पोहनेरकर...

याविषयी वीज वितरण मंडळाचे अंबड येथील अभियंता देवकर यांच्याकडे याविषयी विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, '2011 मध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष योजना सुरू होती. या योजनेअंतर्गत हे काम होणार होते. मात्र सध्या ती योजना स्थगित आहे. तसेच विद्युत साहित्य नसल्याने, जोडणी देता आली नाही. कोटेशन भरल्यानंतर त्यांच्याकडून सरासरी बिलाची आकारणी करण्यात आली आहे. आता त्यांनी घेतलेल्या पिकाचे उत्पादन आणि तलाठ्यांनी याबाबत सात-बारावर केलेली नोंद, याची तपासणी करून हे बिल रद्द करण्यात येईल.'

सविता यांच्या नावे साडेचार एकर जमीन आहे. त्यांनी शेतामध्ये विहीर खणली असून त्याला पाणीही लागले आहे. त्यात त्यांनी कसेबसे करुन वीज जोडणीसाठी कोटोशनही भरले. पण अद्याप वीज जोडणी करण्यात आलेली नाही. त्यात महावितरणाने तीस हजाराचे बिल पाठवून महिला शेतकरीच्या तोंडाचे पाणी पळवले आहे. दरम्यान, सविता यांनी आपली वीज जोडणी दुसऱ्याला दिली असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा - अभिमानास्पद; शेतकऱ्याचा मुलगा झाला नायब तहसीलदार

हेही वाचा - जालन्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन वाहनधारक होतायेत पसार

Last Updated : Jun 22, 2020, 11:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.