ETV Bharat / state

'जल है तो कल है', जालन्यातील लोकमान्य गणेश मंडळाने साकराला देखावा

'जल है तो कल है' हे ब्रीदवाक्य घेऊन महाभारतातील भीष्म पितामह यांच्या शेवटच्या क्षणाचा देखावा लोकमान्य गणेश मंडळाने केला आहे. या देखाव्यातून त्यांनी पाणी बचतीचा संदेश दिला आहे.

जालन्यातील लोकमान्य गणेश मंडळाचा पाणी बचतीचा संदेश
author img

By

Published : Sep 9, 2019, 12:38 PM IST

जालना - 'जल है तो कल है' हे ब्रीदवाक्य घेऊन महाभारतातील भीष्म पितामह यांच्या शेवटच्या क्षणाचा देखावा लोकमान्य गणेश मंडळाने केला आहे. या देखाव्यातून त्यांनी पाणी बचतीचा संदेश दिला आहे. गेल्या 35 वर्षांपासून डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवर असलेल्या लोकमान्य गणेश मंडळाची सजीव देखाव्यांची परंपरा कायम आहे.

समाजाला कुठला ना कुठला तरी संदेश देता यावा हा यांचा मूळ उद्देश .यावर्षीदेखील या गणेश मंडळाने मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

जालन्यातील लोकमान्य गणेश मंडळाचा पाणी बचतीचा संदेश

महाभारत हे सर्वांनाच माहीत आहे. यामधील भीष्म पितामह यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी पाण्यासंदर्भात करण्यात आलेला हा देखावा आहे. ज्यावेळी भीष्मपितामह बाणांच्या शय्येवर शेवटच्या घटका मोजत असतात, त्यावेळेस त्यांना तहान लागते आणि ते अर्जुनाला पाणी मागतात,अर्जुन जमिनीमध्ये बाण मारून गंगा बाहेर काढून भीष्म पितामह यांच्या मुखामध्ये पाण्याची धार सोडतो. त्यावेळी एक बाण मारल्यानंतर निघालेल्या पाण्याची धार ही त्याकाळची पाणीपातळी दाखवते आणि आज सहाशे ते सातशे फूट जमिनीत छिद्र पडल्यानंतरही पाणी येत नाही. या दोन्ही परिस्थितीतील म्हणजेच सत्ययुग आणि कलियुग या दोन्ही युगामध्ये माणसाने पर्यावरणाची केलेली हानी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

भविष्यात जर आपण जलसंचय केला नाही, पाणी बचत केली नाही तर आपल्याला देखील पाण्याशिवाय तडफडण्याची वेळ येईल. त्यामुळे 'जल है तो कल है' असा संदेश पौराणिक कथेच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न या गणेश मंडळाने केला आहे.

Intro:"जल है तो कल है" हे ब्रीदवाक्य घेऊन महाभारताच्या भीष्म पितामह यांच्या शेवटच्या क्षणाचा देखावा घेऊन लोकमान्य गणेश मंडळ पाणी बचतीचा संदेश देत आहे. गेल्या 35 वर्षांपासून डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवर असलेल्या लोकमान्य गणेश मंडळाची सजीव देखाव्यांची परंपरा आहे .समाजाला कुठला ना कुठला तरी संदेश देता यावा हा यांचा मूळ उद्देश .यावर्षीदेखील या गणेश मंडळाने मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

Body:महाभारत हे सर्वांनाच माहीत आहे यामधील भीष्मपितामह यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी पाण्यासंदर्भात करण्यात आलेला हा देखावा. ज्यावेळी भीष्मपितामह बाणांच्या शय्येवर शेवटच्या घटका मोजत असतात, त्यावेळेस त्यांना तहान लागते आणि ते अर्जुनाला पाणी मागतात ,अर्जुन जमिनीमध्ये बाण मारून गंगा बाहेर काढून भीष्मपितामह यांच्या मुखामध्ये पाण्याची धार सोडतो. त्यावेळी एक बाण मारल्यानंतर निघालेल्या पाण्याची धार ही त्याकाळची पाणीपातळी दाखवते आणि आज सहाशे ते सातशे फूट जमिनीत छिद्र पडल्यानंतरही पाणी येत नाही .या दोन्ही परिस्थितीतील म्हणजेच आणि सत्ययुग आणि कलियुग या दोन्ही युगामध्ये माणसाने पर्यावरणाची केलेली हानी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. याच सोबत भविष्यात जर आपण जलसंचय केला नाही, पाणी बचत केली नाही तर आपल्याला देखील पाण्याशिवाय तडफडण्याची वेळ येईल. त्यामुळे "जल है तो कल है" असा संदेश पौराणिक कथेच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न या गणेश मंडळाने केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.