ETV Bharat / state

शेतकरीवर्गाला बळ देण्यासाठी साहित्यिकांनी प्राधान्याने लेखन करावे - अमर हबीब - b raghunath award

जालना शहरातील जे. ई. एस. महाविद्यालयात  कवी बी. रघुनाथ साहित्य मित्र पुरस्काराचे वितरण अमर हबीब यांच्या हस्ते  करण्यात आले.

वी बी. रघुनाथ साहित्य मित्र पुरस्काराचे वितरण अमर  हबीब यांच्या हस्ते  करण्यात आले.
author img

By

Published : Sep 18, 2019, 6:20 PM IST

Updated : Sep 18, 2019, 7:43 PM IST

जालना - शेतकरी बांधव शुद्ध बीजाची निवड करून पेरणी करतो. त्यातून कसदार अन्नधान्य उत्पादन करतो. त्याचप्रमाणे साहित्यिकांनी देखील कसदार साहित्य निर्माण करावे. शेतकरीवर्गाला बळ देण्यासाठी देखील साहित्यिकांनी प्राधान्याने लेखन करावे, अशी अपेक्षा साहित्यिक तथा किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी व्यक्त केली.

कवी बी. रघुनाथ साहित्य मित्र पुरस्काराचे वितरण अमर हबीब यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील जे. ई. एस. महाविद्यालयात कवी बी. रघुनाथ साहित्य मित्र पुरस्काराचे वितरण अमर हबीब यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सुधाकर जाधव यांना हा पुरस्कार वितरित करण्यात आला रोख पाच हजार रुपये, शाल श्रीफळ आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा दत्तात्रय गोविंदराव सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आणि भाषा, साहित्य, संस्कृती, आणि संशोधन परिषद जालना शाखेच्यावतीने करण्यात आले होते.

हेही वाचा - आमदाराचं दत्तक गाव-पाण्यासाठी धावाधाव, खोतकरांच्या नंदापूरमध्ये ४ रुपयाला हंडा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक देशमाने हे होते. यावेळी कवी-गीतकार डॉ. दासू वैद्य, प्राचार्य जवाहर काबरा, मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कपिल आकात, वाचनालयाचे अध्यक्ष राजेभाऊ नाईक, डॉ. राज रणधीर आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - शिक्षणाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर अनुदानित शिक्षकांचे उपोषण मागे

यावेळी बोलताना कवी दासू वैद्य म्हणाले की, साहित्यक्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता हा प्रवाही असला पाहिजे. मार्गदर्शक खूप झाले आहेत, परंतु योग्य मार्गाने जाणारे मात्र दुर्मिळ झाले असल्याचे खंतही डॉक्टर दासू यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात डॉ अशोक देशमाने यांनी साहित्य चळवळ वाचकप्रिय व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Intro:शेतकरी बांधव शुद्ध बीजाची निवड करून पेरणी करतो आणि त्यातून कसदार अन्नधान्य उत्पादन करतो त्याचप्रमाणे साहित्यिकांनी देखील कसदार साहित्य निर्माण करावे, कसदार जमिनीवर शेतकरी शुद्ध बीजारोपण करतो त्यातून त्याला समाधानही मिळते या शेतकरीवर्गाला बळ मिळविण्यासाठी देखील साहित्यिकांनी प्राधान्याने लेखन करावे, अशी अपेक्षा साहित्यिक तथा किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी व्यक्त केली. कवी बी. रघुनाथ साहित्य मित्र पुरस्कार हबीब यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते .डॉ. सुधाकर जाधव यांना हा पुरस्कार वितरित करण्यात आला रोख पाच हजार रुपये, शाल श्रीफळ आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Body:शहरातील जे .ई.एस. महाविद्यालयात चिकलठाणा तालुका सेलू येथील स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा दत्तात्रय गोविंदराव सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आणि भाषा, साहित्य, संस्कृती, आणि संशोधन परिषद जालना शाखेच्यावतीने आयोजित कवी बी. रघुनाथ साहित्य मित्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक देशमाने हे होते.
यावेळी कवी-गीतकार डॉ. दासू वैद्य ,प्राचार्य जवाहर काबरा, मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कपिल आकात, वाचनालयाचे अध्यक्ष राजेभाऊ नाईक, डॉ. राज रणधीर आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना हबीब म्हणाले की, शेतकरी बांधवांचे प्रश्न सुटावेत आणि बळ मिळावे अशी साहित्य निर्मिती झाली पाहिजे.
यावेळी बोलताना कवी दासू वैद्य म्हणाले की, साहित्यक्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता हा प्रवाही असला पाहिजे .मार्गदर्शक खूप झाले आहेत, परंतु योग्य मार्गाने जाणारे मात्र दुर्मिळ झाले असल्याचे खंतही डॉक्टर दासू यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात डॉ अशोक देशमाने यांनी साहित्य चळवळ वाचकप्रिय व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाला बसवराज कोरे ,रावसाहेब ढवळे डॉ यशवंत सोनूने, डॉ संजीवनी तडेगावकर ,प्रा रमेश भुतेकर, डॉ ज्योती धर्माधिकारी, प्रतिभा श्रीपत, आदींची उपस्थिती होती.

Conclusion:
Last Updated : Sep 18, 2019, 7:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.