ETV Bharat / state

Lathicharge on Maratha Protester : ...म्हणून लाठीचार्ज करावा लागला; पोलिसांनी दिले स्पष्टीकरण - Lathicharge on Maratha Protester in jalna

Lathicharge in Jalna अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान या घटनेची अधिकची माहिती औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.

Lathicharge in Jalna
मराठा आंदोलनावर लाठी चार्ज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 10:41 AM IST

माहिती देताना पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण

जालना : Lathicharge on Maratha Protester : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज (Lathicharge in Jalna) केला. यामुळे चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस आणि आंदोलक जखमी झाले आहेत.

पोलिस प्रशासनाचे स्पष्टीकरण - मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी तातडीने जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत लाठीचार्ज करण्यामागचे कारण सांगितले. आंदोलकांची मनधरणी करत असताना अचानक पोलिसांवर दगडफेक झाली. त्यामुळे आम्हाला लाठीचार्ज करावा लागला, असे स्पष्टीकरण ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिले.

मनोज पाटील यांची तब्येत खालावली : चार दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलकांच्या संपर्कात पोलीस प्रशासन सतत होते. दरम्यान, उपोषणासाठी बसलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्याने पोलिस व जिल्हा प्रशासन त्यांच्या प्रकृतीची पडताळणी करत होते. तर पुढील औषध उपचारासाठी त्यांना तिथून घेऊन जाण्यासाठी त्यांची मनधरणीही करत होते. पोलिसांच्या या प्रयत्नाला जरांगे पाटील यांनी प्रतिसादही दिला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांवर केली दगडफेक : जमावाने अचानक पोलिसांवर विशेषतः महिला पोलिसांवर दगडफेक केली. त्यात जवळपास ४५ पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. त्यातील काहींवर अंबड उपजिल्हा रुग्णालयात तर काहींवर जालना येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली. त्यांनी जालना जिल्हा सरकारी रुग्णालयात घेऊन जखमींची भेट घेत विचारपूस केली. तर घडलेला प्रकार निश्चितच चुकीचा झाला आहे. याबद्दल समाज माध्यमांच्या वतीने चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे चव्हाण म्हणाले. नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा -

  1. Lathicharge in Jalna : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवरून शरद पवारांची सरकारवर टीका, मुख्यमंत्री म्हणाले..
  2. Lathicharge in Jalna: मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं आंदोलकांसह पोलीसही जखमी
  3. Maratha Reservation : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा...मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.