जालना - संपूर्ण देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून आज घरोघरी भोकरदन तालुक्यात लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
नागरिकांनी आपल्या घरी, तसेच व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानामध्ये विधिवत लक्ष्मीपूजन केले. दिवाळी असल्याने भोकरदन शहरातील घरांसमोर विविध प्रकारच्या आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सोबतच फुलमाळा विद्युत रोषणाईचा वापर करून सुंदर सजावट करण्यात आली होती. सायंकाळी लक्ष्मीपूजनानंतर लहानग्यांसह मोठ्यांनीही फटाके वाजवत हा सण साजरा केला.
मात्र दुसरीकडे, परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडल्याने, ग्रामीण भागात दिवाळीचा तितकासा उत्साह दिसून आला नाही.
हेही वाचा : विरार येथील फर्निचर दुकान जळून खाक, फटाक्याच्या ठिणगीने आग लागल्याची शक्यता