ETV Bharat / state

जालन्यात तरुणाचे अपहरण करून चाकू हल्ला - जालना जिल्हा

रस्त्याने जाणाऱ्या तरुणाचे अपहरण करून, त्याच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना जालन्यात घडली आहे. यावेळी तरुणाला आरोपींनी मारहाण देखील केली आहे. वैभव रवींद्र गुप्ता असे या तरुणाचे नाव आहे.

attacked on youth
तरुणावर चाकू हल्ला
author img

By

Published : Oct 28, 2020, 10:51 PM IST

जालना - रस्त्याने जाणाऱ्या तरुणाचे अपहरण करून, त्याच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना जालन्यात घडली आहे. यावेळी तरुणाला आरोपींनी मारहाण देखील केली आहे. वैभव रवींद्र गुप्ता असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकराने जुना जालन्याच्या डबल जीन परिसरात खळबळ उडाली आहे.पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

तरुणावर चाकू हल्ला

वैभव गुप्ता हे सकाळी सहाच्या सुमारास डबल जीन परिसरातून शनी मंदिर चौकाकडे जात असतांना, पाठीमागून आलेल्या दोन जणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून दुचाकीवर बसवले. त्यानंतर ही दुचाकी घोगरे क्रीडासंकुलात आणली गेली. तीथे तूच वैभव आहेस का? आमच्या रस्त्यातून बाजूला हो, नाहीतर तीस तारखेला बघ काय होते ?असे म्हणत आरोपींनी त्याला मारहाण केली, तसेच त्याच्यावर चाकू हल्ला केला.

"येतो ट्रेलर है, फिल्म अभी बाकी है"

या हल्ल्यात वैभव जमीनीवर कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या खिशामध्ये "येतो ट्रेलर है, फिल्म अभी बाकी है" आमच्या रस्त्यातून बाजूला हो, नाहीतर तीस तारखेला बघ काय होते ते असा मजकूर असलेली चिठ्ठी ठेवून घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.