ETV Bharat / state

Kidnap : जालना चार कोटींच्या खंडणीसाठी दहावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण

जालना - जालन्यात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण करून अज्ञाताने चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. तो दहावीच्या परीक्षा सेंटर असलेल्या पोद्दार शाळेत परीक्षेसाठी गेला होता. परीक्षा संपल्यानंतर त्याचे अपहरण करण्यात आले. परीक्षेची वेळ संपूनही घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी कार चालकाला फोन करून विचारणा केली असता अपहरणकर्त्यांनी चार कोटी आणून द्या व मुलाला घेऊन जा, असे हिंदी भाषेत सांगितले. अपहरण झालेल्या मुलाच्या वडिलांनी तातडीने जालना तालुका पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत जिल्हाभरात नाकाबंदी केली. या दरम्यान अंबड तालुक्यातील शहापूर येथे मुलगा व त्यांच्या वाहनाचा चालक पोलिसांना मिळून आले. अपहरणकर्ते त्यांना रस्त्यातच सोडून पळून गेले. जालना पोलीस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : May 18, 2022, 10:50 PM IST

माहिती देताना प्रभारी पोलीस अधीक्षक

हेही वाचा - तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला वाचवले.. पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.