ETV Bharat / state

अजित दादांकडे पालकमंत्री राजेश टोपे यांची तक्रार करणार - कैलास गोरंट्याल - जालना न्यूज

जिल्हा नियोजन समितीत 9 विशेष निमंत्रित सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या निमंत्रित सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे 6, शिवसेनेच्या 2 तर काँग्रेसच्या केवळ एका जणाची नियुक्ती करण्यात आली आहे. यात काँग्रेसला अपेक्षित स्थान न मिळाल्याने काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल ( Kailash Gorantyal on Rajesh Tope ) चांगलेच आक्रमक झाले आहेत.

कैलास गोरंट्याल-राजेश टोपे
Kailash Gorantyal-Rajesh Tope
author img

By

Published : Feb 5, 2022, 7:59 PM IST

जालना - जालन्यातील जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा नियोजन समितीत 9 विशेष निमंत्रित सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या निमंत्रित सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे 6, शिवसेनेच्या 2 तर काँग्रेसच्या केवळ एका जणाची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या रूपानं पालकमंत्री राजेश टोपे यांनी काँग्रेसच्या केवळ एकाच सदस्याची जिल्हा नियोजन समितीत नियुक्ती केली. त्यामुळे काँग्रेसला अपेक्षित स्थान न मिळाल्याने काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल ( Kailash Gorantyal on Rajesh Tope ) चांगलेच आक्रमक झाले आहेत.

कैलास गोरंट्याल यांची राजेश टोपे यांच्यावर टीका

जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या नियुक्त्या या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केल्या असून मी महाविकास आघाडीचा धर्म पाळला असल्याच पालकमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं. तर राजेश टोपे यांना राजकारणात मी सिनिअर आहे. त्यांनी मला राजकारण शिकवू नये, असा टोला गोरंटयाल यांनी टोपे यांना लगावला.

पालकमंत्री राजेश टोपे यांची भूमिका

काँग्रेस-राष्ट्रवादीला जिल्हा नियोजन समितीत समान न्याय अपेक्षित असताना टोपे यांनी राष्ट्रवादीच्या 6 पदाधिकाऱ्यांची जिल्हा नियोजन समितीत नियुक्ती का केली, याचा त्यांना जाब विचारला असून काँग्रेसच्या वरिष्ठांसह अजित पवारांकडे तक्रार करणार असल्याच काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनी म्हटलं. याशिवाय पालकमंत्र्यांनी आतापर्यंत दोनच समित्यावरील नियुक्त्या केल्या असून 2 वर्षांपासून ईतर समित्यांवरील नियुक्त्या पालकमंत्र्यांमुळेच रखडल्याचा आरोपही गोरंटयाल यांनी केला आहे. सर्व समित्यांमध्ये आम्ही आमचा अधिकार घेऊनच राहू अन्यथा आम्हांला वेगळा विचार करावा लागेल, असा ईशाराही गोरंटयाल यांनी टोपे यांना दिला.

हेही वाचा - Lata Mangeshkar health : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, आयसीयूत उपचार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.