जालना - कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांना भारतीय जनता पक्षाच्यावतीने अद्यापपर्यंत तिकीट देण्यात आले नाही. त्यामुळे पक्षाने त्वरित तिकीट द्यावे अन्यथा राज्यभरातील 20 लाख कैकाडी समाज विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकेल, असा इशारा कैकाडी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. गांधीचमन परिसरात कैकाडी समाज बांधवांनी एकत्र येत केंद्रीय राज्य मंत्री खासदार रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले आहे.
हेही वाचा - मी कोणत्याही चौकशीला तयार, गुन्हे लपवणाऱ्यांची न्यायालयातून माहिती मिळते; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
या निवेदनात म्हटले आहे की आमदार नरेंद्र पवार यांनी मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे, तसेच दुष्काळी परिस्थितीमध्ये जालन्यात 501 जोडप्यांचे सामूहिक विवाह लावून सामाजिक कार्यालाही हातभार लावलेला आहे. अशा कार्यशील उमेदवाराला भारतीय जनता पक्षाने जर तिकीट दिले नाही, तर महाराष्ट्रातील 20 लाख कैकाडी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र पवार यांच्या पाठीशी हा समाज आहे. त्यांना तिकीट न दिल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर बाबुराव पवार, बाबुराव जाधव, अशोक पवार, सुरेश गायकवाड, आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
हेही वाचा - भाजपमध्ये बंडखोरी? यादीत नाव नसतानाही एकनाथ खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल