जालना - शहरातील गणपती विसर्जन सुरू असताना लक्ष्मीपुरा जुना जालना परिसरातून गावठी पिस्टल सोबत बाळगणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणाला कदीम जालना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गावठी पिस्टल जप्त केली आहे.
कमरेला आढळले गावठी पिस्टल -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 21 वर्षीय तरुण पांढऱ्या रंगाचे कपडे घालून गणपती विसर्जन उत्सवाच्या दरम्यान लक्ष्मीपुरा जुना जालना परिसरात कमरेला गावठी पिस्टल लावून फिरत असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शहरातील लक्ष्मीपुरा जुना जालना परिसरातील गल्लीतून जाणाऱ्या या एकवीस वर्षीय तरुणीची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या कमरेला मागील बाजूस पॅण्टमध्ये एक गावठी पिस्टल आढळून आल्याने आरोपीला जेरबंद केले. पोलिसांनी पिस्टल बाबत विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखिलेश बालाजी तल्ला रा.लक्ष्मीपुरा जुना जालना विरोधात कदीम जालना पोलिसांत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करता आहेत.
हेही वाचा - वर्सोव्यात गणेश विसर्जनादरम्यान 5 मुले समुद्रात बुडाली