जालना - भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरातून आठ दिवसांपूर्वी पोलिसांनी वाळू माफियांविरोधात कारवाई केली होती. या कारवाईमध्ये अवैध वाळू उपसा करणारा एक जेसीबीही जप्त करण्यात आला होता. हा जप्त केलेला जेसीबी भोकरदन तहसीलदार कार्यालयातून पळवून नेल्याची घटना घडली.
राजूर पोलिसांनी भोकरदन तहसील कार्यालयात हा जेसीबी (एमएच २१ डीएफ ७८६२) जमा केला होता. बुधवारी रात्री हा जेसीबी पळवून नेण्याचा प्रकार झाला. जेसीबीचा मालक नारायण कुंडलिक पवार (रा. चांदई एक्को) यानेच हा जेसीबी तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेला.
हेही वाचा - नागपूर महापालिकेत 5 दिवसांचा आठवडा, आयुक्त तुकाराम मुंढेंनी काढले परिपत्रक
या प्रकरणी कोतवाल शेख इस्माईल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करत आहेत.