ETV Bharat / state

शेरसवार दर्गा जमीन घोटाळा; मुख्य सूत्रधार जमील मौलानाला अखेर अटक - जालना

जमील मौलाना हे अधिकृत मुतवल्ली नसून, त्यांना या जमिनीचा कोणताही खरेदी विक्रीचा अधिकार नसून त्यांनी फसवणूक केल्याचे नमूद केले होते. याप्रकरणी पोलिसांनी कलमाखाली आणि वक्फ अधिनियम 52 (अ) अन्वये जमील मौलाना, शेख वहिदोदिन, मोहम्मद मुसा व अन्य लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

जमील मौलाना यांना अखेर अटक
author img

By

Published : Sep 11, 2019, 5:03 PM IST

जालना - शेरसवार दर्गा जमीन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार जमील मौलाना यांना अखेर अटक करण्यात आली आहे. शहरातील सर्व्हे नं. 2, 101, 102,103 मधील तब्बल 28 एकर 16 गुंठे जमीन दर्गा सय्यद अहमद शेरसवार यांच्या मालकीची आहे. तर दर्ग्याचे तथाकथित मुतवल्ली सय्यद जमील सय्यद जानिमिया उर्फ जमील मौलाना यांनी शहरातील काही लोकांशी संगनमत करून त्या जमिनीवर भूखंड पाडून मोठ्या प्रमाणात शॉपिंग सेंटर व अन्य बांधकाम केले आहे.

हेही वाचा - 'जल है तो कल है', जालन्यातील लोकमान्य गणेश मंडळाने साकराला देखावा

यातून सन 2002 ते 2019 या काळात तब्बल 600 लोकांनी गाळे व भुखंड विक्री करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. यासंदर्भात औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज अहमद सिराज अहमद यांनी 27 मे 2019 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा - जालन्यात शेतात झोपलेल्या वृद्धाची डोक्यात दगड घालून हत्या, कारण अस्पष्ट

जमील मौलाना हे अधिकृत मुतवल्ली नसून, त्यांना या जमिनीचा कोणताही खरेदी विक्रीचा अधिकार नसून त्यांनी फसवणूक केल्याचे नमूद केले होते. याप्रकरणी पोलिसांनी कलमाखाली आणि वक्फ अधिनियम 52 (अ) अन्वये जमील मौलाना, शेख वहिदोदिन, मोहम्मद मुसा व अन्य लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर जमील मौलाना यांनी जिल्हा सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान, बुधवारी जमील मौलाना यांना डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्यासह पथकातील रामदास काकडे, संदीप बोन्द्रे, विठ्ठल खार्डे यांनी अटक केली.

Intro:

शेरसवार दर्गा जमीन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार जमील मौलाना यांना अखेर अटक*
*©डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्या पथकाची कारवाई.

जालना शहरातील सर्व्हे नं. २, १०१, १०२,१०३ मधील तब्बल २८ एकर १६ गुंठे जमीन दर्गा सय्यद अहमद शेरसवार यांच्या मालकीची आहे.
दर्ग्याचे तथाकथित मुतवल्ली सय्यद जमील सय्यद जानिमिया उर्फ जमील मौलाना यांनी शहरातील काही लोकांशी संगनमत करून त्या जमिनीवर भूखंड पाडून मोठ्या प्रमाणात शॉपिंग सेंटर व अन्य बांधकाम केले.
यातून सन २००२ ते २०१९ याकाळात तब्बल ६०० लोकांना गाळे व भुखंड विक्री करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती._
यासंदर्भात औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज अहमद सिराज अहमद यांनी २७ मे २०१९ रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
जमील मौलाना हे अधिकृत मुतवल्ली नसून, त्यांना या जमिनीचा कोणताही खरेदीविक्रीचा अधिकार नसून त्यांनी फसवणूक केल्याचे नमूद केले होते.
याप्रकरणी पोलिसांनी भादंवि. ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४०३, ४०६, ३४ आणि वक्फ अधिनियम ५२(अ) अन्वये जमील मौलाना, शेख वहिदोदिन, मोहम्मद मुसा व अन्य अशा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जमील मौलाना यांनी जिल्हा सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते, मात्र, त्यात यश येत नव्हते.
दरम्यान, आज जमील मौलाना यांना Dysp सुधीर खिरडकर यांच्यासह पथकातील पोहवा. रामदास काकडे, पोना. संदीप बोन्द्रे, विठ्ठल खार्डे यांनी अटक केली आहे.Body:0000Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.