ETV Bharat / state

जालन्यातील तरुणाची मुंबईत आत्महत्या, आत्महत्येपुर्वी केले फेसबुक लाईव्ह

author img

By

Published : Aug 5, 2021, 6:39 PM IST

जालना जिल्ह्यातील रेणुकाई पिंपळगावच्या तरुणाने मुंबईतील कल्याण परिसरात राहत्या घरात आत्महत्या केली आहे. दरम्यान, आत्महत्येपुर्वी या तरुणाने फेसबुक लाईव्ह केले आहे. ही घटना आज सकाळी साडे सातच्या सुमारास घडली आहे. अंकुश नामदेव पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

जालन्यातील तरुणाची मुंबईत आत्महत्या (अंकुश नामदेव पवार)

जालना - जालना जिल्ह्यातील रेणुकाई पिंपळगावच्या तरुणाने मुंबईतील कल्याण परिसरात राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, आत्महत्येपुर्वी या तरुणाने फेसबुक लाईव्ह केले आहे. ही घटना आज सकाळी साडे सातच्या सुमारास घडली आहे. त्याने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केल्याने एकच खबळ उडालीय आहे. या तरुणाने आपण प्रेम प्रकरणातून आत्महत्या करत असल्याचे, या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले आहे. ही घटना मुंबईतील कल्याण भागातील महात्मा फुले पोलीस ठाणे या परिसरात घडली आहे. अंकुश नामदेव पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मुंबईत नोकरीच्या शोधासाठी गेला होता

गेल्या दीड वर्षापासून अंकुश मुंबईतील कल्याण परिसरात एका खाजगी रुग्णालयात वार्ड बॉय म्हणून नोकरी करत होता. अंकुश हा मूळचा जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रहिवासी होता. तो मुंबईत नोकरीच्या शोधासाठी गेला होता, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्याच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

प्रेम प्रकरणातुन केली आत्महत्या

आत्महत्या करताना आपण एका मुलीवर प्रेम करत असल्याचे, त्याने केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले आहे. आपल्याकडे काही पैसे असावेत म्हणून आपण त्या मुलीकडे पैसेही दिले असल्याचे, त्याने म्हटले आहे. मात्र, त्या तरुणीने आपली फसवणूक करून धोका दिल्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करत असल्याचे, म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.