ETV Bharat / state

जालना बसस्थानकाचे काम २ वर्षांपासून रखडले; प्रवाशांची गैरसोय, उत्पन्नावरही पाणी

शहर बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी एका बाजूचा भाग पाडण्यात आला. यानंतर खड्डेही खोदून ठेवले आहेत. मात्र, पुढील बांधकाम अद्यापही सुरू झालेले नाही. तसेच ज्या बाजूचा भाग पाडला आहे तिथे फळाची दुकाने, बुक स्टॉल, उपहारगृह, शौचालय या सुविधा मिळत होत्या. मात्र, हे बांधकाम पाडल्यामुळे शौचालय हे बसस्थानकाच्या दुसऱ्या कोपऱ्यात गेले आहे. यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले आहे.

jalna st bus stand reconstruction not complete from 2 years, tourists facing problems
जालना बसस्थानकाचे काम २ वर्षांपासून रखडले
author img

By

Published : Jan 31, 2020, 12:35 PM IST

जालना - शासनाच्या विविध योजनांचे पैसे शासनाकडेच थकले आहेत, असे शहर बस स्थानक प्रशासन म्हणत आहे. मात्र, सध्या शहर बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून बस स्थानक दुरुस्तीच्या नावाखाली पाडलेल्या इमारतीच्या नुतनीकरणाचा खोळंबा झाला आहे. प्रवाशांचे हाल होत आहेत. तर यासोबत येथे भाड्याने दिलेली दुकाने देखील बंद असल्यामुळे अन्य व्यावसायिकांचा बस स्थानकात मुक्त वावर सुरू झाला आहे. बस स्थानकाच्या दुरुस्ती संदर्भात विभाग नियंत्रक उद्धव वावरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी अधिक बोलणे टाळले.

जालना बसस्थानकाचे काम २ वर्षांपासून रखडले

एका हॉकर लायसन्सच्या नावाखाली प्रत्येकाने चार-चार दुकाने थाटली आहेत. यामुळे उत्पन्नासाठी धडपडणार्‍या एसटी महामंडळाचे हक्काच्या उत्पन्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. शहर बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी एका बाजूचा भाग पाडण्यात आला. यानंतर खड्डेही खोदून ठेवले आहेत. मात्र, पुढील बांधकाम अद्यापही सुरू झालेले नाही. तसेच ज्या बाजूचा भाग पाडला आहे तिथे फळाची दुकाने, बुक स्टॉल, उपहारगृह, शौचालय या सुविधा मिळत होत्या. मात्र, हे बांधकाम पाडल्यामुळे शौचालय हे बसस्थानकाच्या दुसऱ्या कोपऱ्यात गेले आहे. यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले आहे. उघड्यावर लघुशंका करण्याचे प्रमाण वाढले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे महिलांची कुचंबणा होत आहे.

हेही वाचा - 'मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत तपासणी करावी लागणार'

तसेच या बाजूने बाहेर जाणाऱ्या बस आणि पुणे, औरंगाबादकडे जाणाऱ्या बस थांबा असल्यामुळे धुळीचे प्रमाणही वाढले आहे. प्रवासी तर थोडावेळ नाकाला रुमाल लावून जातात. मात्र, येथे काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे तसेच अन्य व्यावसायिकांचे काय हाल होत असतील? हा प्रश्न देखील विचार करायला लावणार आहे. या धुळीमुळे श्वसनाचे त्रास वाढले आहेत. बस स्थानकात कुठेही डांबरीकरण राहिलेले नाही. त्यामुळे बस स्थानकाची ग्रामीण भागातील बसस्थानकासारखी अवस्था झाली आहे. मात्र प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे.

Intro:शासनाच्या विविध योजनांचे पैसे शासनाकडेच थकले आहेत ,असे म्हणत जबाबदारी झटकणाऱ्या जालना बस स्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून बस स्थानक दुरुस्तीच्या नावाखाली पाडलेली इमारत आज "असून अडचण नसून खोळंबा झाली आहे "प्रवाशांचे हाल तर होतच आहेत त्याच सोबत इथे किरायाने दिलेली दुकाने देखील बंद असल्यामुळे अन्य व्यावसायिकांचा बस स्थानकात मुक्त वापर सुरू झाला आहे .एका हॉकर लायसन च्या नावाखाली प्रत्येकाने चार -चार दुकाने थाटली आहेत. ्यामुळे एकीकडे उत्पन्नासाठी धडपडणार्‍या एसटी महामंडळाचे दुसरीकडे या हक्काच्या उत्पन्नकडे मात्र दुर्लक्ष आहे.

Body:दोन वर्षांपूर्वी जालना बस स्थानकाचे नूतनीकरण करायचे आहे म्हणून एका बाजूचा भाग पाडण्यात आला आहे .खड्डे खोदून ठेवले आहेत मात्र पुढील बांधकाम अद्यापही सुरू नाही .ज्या बाजूचा भाग पाडला आहे तिथे फळाची दुकाने, बुक स्टॉल, उपहारगृह ,शौचालय या सुविधा मिळत होत्या .परंतु हे बांधकाम पाडल्यामुळे शौचालय हे बसस्थानकाच्या दुसऱ्या कोपऱ्यात गेले आहे. पत्राच्या आडोशाला असलेल्या शौचालयाला कडे जाताना रात्रीच काय दिवसाही महिलांना खाली मान घालून जावे लागते. शौचालय बाजूला असून देखील तेथील गैर सोई मूळे पुरुष मंडळी उघड्यावरच लघुशंका करताहेत .महिलांची कुचंबना होत आहे .याच बाजूने बाहेर जाणाऱ्या बस आणि पुणे औरंगाबाद कडे जाणाऱ्या बस थांबा असल्यामुळे धुळीचे प्रमाणही वाढले आहे. प्रवासी तर थोडावेळ नाकाला रुमाल लावून जातीलही, मात्र इथे काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे तसेच अन्य व्यावसायिकांचे काय हा प्रश्न देखील विचार करायला लावणार आहे ?या धुळीमुळे श्वसनाचे त्रास वाढले आहेत. बस स्थानकात कुठेही डांबरीकरण राहिलेले नाही .त्यामुळे फलाटावर जा किंवा समोरच्या बाजूला जा,ग्रामीण भागातील बस स्थानका प्रमाणे याची दुरावस्था झाली आहे. बसच्या पाठीमागे धुळीचे लोळ आणि या धुळी मध्ये माखणारा प्रवासी वैतागून जात आहे. बस स्थानकाच्या दुरुस्ती संदर्भात विभाग नियंत्रक उद्धव वावरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यासंदर्भात आपण काही बोलू शकत नाहीत असे म्हणून त्यांनी टाळले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.