ETV Bharat / state

काय होणार जालना नगर परिषदेत? चर्चेला उधाण - Friday

जालना पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या जागेवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नितीन जनार्दन नार्वेकर यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, आज सायंकाळपर्यंत नार्वेकर जालन्यात दाखल झाले नाहीत. त्यामुळे उद्या या चौकशी समितीला कोण समोर जाणार? हादेखील एक पेच प्रशासनासमोर आहे.

काय होणार जालना नगर परिषदेत? चर्चेला उधाण
author img

By

Published : Jul 25, 2019, 11:21 PM IST

जालना - आयएसओ मानांकन प्राप्त जालना नगर परिषदेत उद्या महाचौकशी होणार आहे. पाच उच्चपदस्थ अधिकारी ही चौकशी करणार आहेत. उद्या चौकशी आहे आणि बुधवारी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली आहे. या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुख चांगलेच हादरले आहेत. कारण मुख्याधिकारी जर उद्या या चौकशीला गैरहजर असतील तर, विभाग प्रमुखांना चौकशी समितीला सामोरे जावे लागणार आहे. असे झाले तर याचा फायदा निश्चितच नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांना होणार आहे. प्रत्येक आदेश देताना मुख्याधिकाऱ्यांची सही असते, त्यामुळे खुलासा करताना नाही मुख्याधिकारी जर समोर नसतील तर गोलमोल उत्तर देऊन हे विभाग प्रमुख समितीची दिशाभूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज दिवसभर मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला कुलुपच होते.

काय होणार जालना नगर परिषदेत? चर्चेला उधाण

जालना पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या जागेवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नितीन जनार्दन नार्वेकर यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, आज सायंकाळपर्यंत नार्वेकर जालन्यात दाखल झाले नाहीत. त्यामुळे उद्या या चौकशी समितीला कोण समोर जाणार? हादेखील एक पेच प्रशासनासमोर आहे. बुधवारी राज्यपालांच्या आदेशान्वये श्री खांडेकर यांना माध्यानानंतर जालना येथून सेवामुक्त केले असल्याचे म्हटले आहे. मात्र, जालना नगरपालिकेचा पदभार कोणाकडे द्यायचा हा उल्लेख त्यामध्ये नसल्यामुळे प्राप्त माहितीनुसार खांडेकर हे अद्याप अकोट नगरपालिकेत हजर झालेले नाहीत. मात्र, राज्यपालांच्या आदेशान्वये ते जालन्याचे मुख्याधिकारीही नाहीत. हा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. त्यातच बदलून येणारे मुख्याधिकारी नार्वेकर हे देखील हजर झालेले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी जालना नगरपालिकेत होणाऱ्या महाचौकशीला मावळते मुख्याधिकारी संतोष खांडेकर हेच सामोरे जातील अशी माहितीही सूत्रांनी दिली.

शुक्रवारी होणार्‍या चौकशीतील एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यासाठी 50 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा खर्च फक्त सुशोभीकरणावर आहे. या रकमेतून करण्यात आलेले काम अत्यंत भोंगळ पद्धतीचे झाले आहे. महिनाभरापासून पावसाळा सुरू झाल्यामुळे थोडीफार हिरवळ इथे दिसत आहे, कारंजे तर कधीच बंद झाले आहेत. हाय मास्ट 2 दिव्यांपैकी एकच दिवा चालू आहे. या परिसरात असलेल्या बागेत माणसांशिवाय इतर प्राण्यांना मुक्त संचार आहे. चारी बाजूने प्रवेशद्वाराला कुलुपे असतात. मात्र, येथे कुत्र्यांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे निश्चितच पन्नास लाख रुपये खर्च केलेल्या या सुशोभीकरणासंदर्भात शंका आली तर ती चुकीची आहे, का हे उद्या तपासले जाईल.

Intro:आयएसओ मानांकन प्राप्त जालना नगर परिषदेत उद्या महा चौकशी होणार आहे. पाच उच्चपदस्थ अधिकारी ही चौकशी करणार आहेत .उद्या चौकशी आहे आणि काल पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली आहे, या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुख चांगलेच हादरले आहेत .कारण मुख्याधिकारी जर उद्या या चौकशीला गैरहजर असतील तर विभाग प्रमुखांना चौकशी समितीला सामोरे जावे लागणार आहे. असे झाले तर याचा फायदा निश्चितच नगराध्यक्ष सौ संगीता गोरंट्याल यांना होणार आहे .कारण प्रत्येक आदेश देताना मुख्याधिकाऱ्यांची सही असते, त्यामुळे खुलासा करताना नाही मुख्याधिकारी जर समोर नसतील तर गोलमोल उत्तर देऊन हे विभाग प्रमुख समितीची दिशाभूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.आज दिवसभर मात्र मुख्याधिकार्यांच्या दालनाला कुलुपच होते.

Body:जालना पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या जागेवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नितीन जनार्दन नार्वेकर यांची बदली करण्यात आली आहे .परंतु आज सायंकाळपर्यंत श्री नार्वेकर हे जालन्यात दाखल झाले नाहीत. त्यामुळे उद्या या चौकशी समितीला कोण समोर जाणार ?हादेखील एक पेच प्रशासनासमोर आहे .कारण काल राज्यपालांच्या आदेशान्वये श्री खांडेकर यांना माध्यानानंतर जालना येथून मुक्त केले असल्याचे म्हटले आहे .परंतु जालना नगरपालिकेचा पदभार कोणाकडे द्यायचा हा उल्लेख त्यामध्ये नसल्यामुळे प्राप्त माहितीनुसार खांडेकर हे अद्याप पर्यंत अकोट नगरपालिकेत हजर झाले नाहीत. मात्र राज्यपालांच्या आदेशान्वये ते जालन्याचे मुख्याधिकारी ही नाहीत. हा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे त्यातच बदलून येणारे मुख्याधिकारी नार्वेकर हे देखील हजर झाले नाहीत त्यामुळे उद्या दिनांक 26 रोजी जालना नगरपालिकेत होणाऱ्या महा चौकशीला मावळते मुख्याधिकारी संतोष खांडेकर हेच सामोरे जातील अशी माहितीही सूत्रांनी दिली.
* दरम्यान उद्या होणार्‍या चौकशीतील एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यासाठी 50 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे .हा खर्च फक्त सुशोभीकरणवर आहे आणि या रकमेतून इथे करण्यात आलेले काम म्हणजे आंधळं दळतं कुत्र पिठ खातं ,अशाच पद्धतीचे म्हणावे लागेल. महिनाभरापासून पावसाळा सुरू झाल्यामुळे थोडीफार हिरवळ इथे दिसत आहे ,कारंजे तर कधीच बंद झाले आहेत, हाय मास्ट 2 दिव्यांपैकी एकच दिवा चालु आहे. आणि हा सर्व व प्रपंच झाल्यानंतर शिवाजी महाराजांना हार घालण्यासाठी त्यांच्याच घोड्यावर शिर्डी टेकून वर चढावे लागते. हे शिवाजी महाराजांचे दुर्दैव म्हणायचे का ?असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत कारण एवढा खर्च केल्यानंतरही ही जर छत्रपतींना पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिवजयंतीच्या दिवशी धोका पत्करून शिवाजी महाराजांना हार घालायचा तर तो कशासाठी ?असा प्रश्नही या चौकशीच्या निमित्ताने समोर आला आहे. या परिसरात असलेल्या बागेत माणसांशिवाय इतर प्राण्यांना मुक्त संचार आहे. चारी बाजूने प्रवेशद्वाराला कुलूप असतात,मात्र कुत्रे येथे मुक्त संचार करतात .त्यामुळे निश्चितच पन्नास लाख रुपये खर्च केलेल्या या सुशोभीकरण संदर्भात शंका आली तर ती चुकीची आहे का हे उद्या तपासले जाईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.