जालना- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जालना शहरात आजपासून 10 दिवसांसाठी संचाबदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. बुलेटवर पेट्रोलिंग करत पोलीस शहरात पाहणी करत आहेत. यात कोणी विनाकारण घराबाहेर आढल्यावर कारवाई केली जाणार आहे.
बुलेटवर सायरनसह माईक बसवण्यात आले आहेत. त्याद्वारे पोलीस नागरिकांना सूचना देऊ शकतील. तसेच ज्या ठिकाणी चारचाकी गाडी जाऊ शकत नाही असा ठिकाणी बुलेट जाणार आहे. त्यामुळे संचारबंदीची कडक अंमलबजावणी होणार अशा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यामधील एकूण कोरोना बधितांपैकी 85 टक्के रुग्ण जालना शहरातील आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा संचाबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी घरातच बसावे, नियमांचे पालन करावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सूचना केल्या जात आहेत. आज मामा चौकातून पोलिसांच्या गाड्या शहरामध्ये फिरत आहेत.
त्यामुळे आता गल्लीबोळाती टोळके, पत्ते खेळणे, क्रिकेट खेळणे, ओट्यावर गप्पा मारत बसणाऱ्यांव कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग केली जात आहे. तसेच ड्रोन कॅमेऱ्याद्वारेने देखील पाहणी केली जात आहे.