ETV Bharat / state

Judicial custody to Maratha protesters: 33 मराठा आंदोलकांना न्यायालयीन कोठडी; जिल्हा वकील संघांकडून आंदोलकांना पाठिंबा - मराठा आंदोलकांना लाठीचार्ज

Judicial custody to Maratha Protesters : जालन्यात आंतरवली येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी 270 आंदोलकांवर गुन्हे आहेत दाखल आहेत. याचा निषेध करत पुन्हा मराठा समाजानं आज आंदोलन केलं होतं. त्यापैकी आज 33 मराठा आंदोलकांना कोर्टात हजर केलं होतं. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

Judicial custody to Maratha protesters
आंदोलकांना न्यायालयायीन कोठडी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 9:12 PM IST

Updated : Sep 3, 2023, 9:39 PM IST

वकिलांची प्रतिक्रिया

जालना Judicial custody to Maratha Protesters : जालना जिल्ह्यातील आंतरवली येथे मराठा आंदोलकांना पोलिसांकडून झालेल्या अमानूष मारहाराणीच्या निषेधार्थ जालना शहरातील अंबड चौफुली येथे मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीनंतर पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर अनेक आंदोलकांना डिटेक्ट करून ताब्यात घेतलंय. आज 33 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दुपारनंतर त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं असता कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावलीय. आता या आंदोलकांना जामीन अर्ज करता येणार (Maratha protesters Jalna) आहे.

मराठा समाजाच्या वतीने आंदोलन : आज कोर्टात हजर केलेल्या मराठा आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीयं. आपल्या भावना शासनाच्या विरोधात व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र यावेळी पोलिसांनी पुन्हा आंदोलन करताना मारहाण करत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे. या गुन्ह्यांना न घाबरता समाजातील तरुणांनी आपलं आंदोलन चालू ठेवावं. ज्या समाज बांधवांवर पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे, त्या गुन्ह्यांची वकिली जिल्हा वकील संघ लढणार असल्याची माहिती वकील संघाच्यावतीनं आज देण्यात आलीय. तसेच या सर्व समाजाच्या पाठीमागे जालना जिल्हा वकील संघ खंबीरपणे उभा असल्याची माहिती सुद्धा यावेळी वकील संघाच्या तीनं देण्यात आली आहे. (Maratha protesters)

आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज : जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटा गावात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर आता संपूर्ण राज्यातील वातावरण तापलंय. सर्वत्र या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवलाय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील या प्रकरणी केली जातेय. जालना पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उदयनराजे यांनी देखील मराठा आंदोलकांची भेट घेतलीय. या घटनेत आंदोलकांसह पोलीस कर्मचारीही जखमी झालेत.

हेही वाचा :

  1. Maratha Andolan: अजित पवार सभेसाठी कोल्हापुरात आल्यास उद्रेक, सकल मराठा समाजाचा इशारा
  2. Raosaheb Danve On Lathicharge: वातावरण पाहून परिस्थिती हँडल केली, पण जालना पोलिसांचा लाठीचार्ज चुकीचाच- रावसाहेब दानवे
  3. Sharad Pawar On Maratha Reservation : आंदोलकांवर बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, पवारांचं सरकारवर टीकास्त्र

Last Updated : Sep 3, 2023, 9:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.