ETV Bharat / state

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने आरोग्य विभाग सतर्क: जालन्यात 250 खाटा राखीव - corona second wave fear in Jalna

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेऊन जालन्यातदेखील काळजी घेण्यात येत आहे. कोरोनाबाधितांसाठी दोन इमारती राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

जिल्हा रुग्णालय
जिल्हा रुग्णालय
author img

By

Published : Feb 16, 2021, 10:29 PM IST

Updated : Feb 16, 2021, 10:38 PM IST

जालना - जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अर्चना भोसले यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेऊन जालन्यातदेखील काळजी घेण्यात येत आहे. कोरोनाबाधितांसाठी दोन इमारती राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नवीन बांधकाम केलेली इमारत आणि आणि लसीकरण करण्यात आलेले परिचर्या प्रशिक्षण केंद्राची इमारत या दोन्ही इमारतीमध्ये सुमारे अडीचशे खाटा या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने आरोग्य विभाग सतर्क

हेही वाचा-महाराष्ट्र कोरोना अपडेट : रुग्ण संख्येत वाढ; मंगळवारी 3663 नवीन रुग्ण, 39 मृत्यू

सामान्य रुग्णालय पुन्हा मूळ जागी स्थलांतरित-
सामान्य रुग्णालयाजवळ असलेल्या जुन्या इमारतीमधील हे रुग्णालय काही महिन्यांपूर्वीच गांधीचमन येथील स्त्री रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या जुन्या इमारतीमध्ये स्थलांतरित केले होते. मात्र रुग्णांचीआणि प्रशासनाची होणारी हेळसांड पाहता हे रुग्णालय पुन्हा सामान्य रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये 'जैसे थे' सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे याच परिसरात सामान्य रुग्णांसाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांसाठी सेवा उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा-मुंबई कोरोना अपडेट - 461 नवीन रुग्णांची नोंद, 3 मृत्यू

जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. मात्र, मुंबईसारख्या शहरात दोन आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यात येत आहे. रुग्णांची संख्या वाढली तर इमारतीमध्ये राखीव खाटा ठेवण्यात आल्या आहेत.

राज्यात मंगळवारी आढळले 3,663 नवे रुग्ण

राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार कमी झाला होता. रविवारी तब्बल दोन महिन्यानंतर 4 हजार 92 रुग्ण आढळून आले होते. काल (सोमवारी) त्यात काही प्रमाणात घट होऊन 3365 नवे रुग्ण आढळून आले होते. आज (मंगळवारी) पुन्हा रुग्णसंख्या वाढली असून 3,663 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला.

Last Updated : Feb 16, 2021, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.