ETV Bharat / state

'त्या' तिघांचा मृत्यू कोरोनामुळे नाही, शल्य चिकित्सकांचा दावा - jalna corona news

जिल्हा सामान्य रुग्णालयात तिघांचा मृत्यू झाला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावाने तिघे दगावल्याचे मेसेज सर्वत्र व्हायरल होत होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा वाढल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली.

corona in jalna
'त्या' तिघांचा मृत्यू कोरोनामुळे नाही, शल्य चिकित्सकांचा दावा
author img

By

Published : Apr 25, 2020, 3:02 PM IST

जालना - जिल्हा सामान्य रुग्णालयात तिघांचा मृत्यू झाला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावाने तिघे दगावल्याचे मेसेज सर्वत्र व्हायरल होत होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा वाढल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली.

'त्या' तिघांचा मृत्यू कोरोनामुळे नाही, शल्य चिकित्सकांचा दावा

मात्र या तिघांच्या मृत्यूशी कोरोनाचा काहीही संबंध नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध आजारांसाठी अनेक रुग्ण दाखल होतात. यामधील तीन रुग्णांचा शनिवारी (२५. एप्रिल) मृत्यू झाला. संबंधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची अफवा सर्वत्र पसरली.

कोणतीही शाश्वती नसताना पसरलेल्या या अफवेमुळे प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टरांचे फोन वाजायला सुरुवात झाली. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांची प्रत्यक्ष भेट देऊन मृतांची माहिती घेतल्यानंतर या तिघांचाही मृत्यू अन्य आजारांनी झाल्याचे निष्पन्न झाले.

मात्र, खबरदारीसाठी या तिघांचे स्वॅब घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती डॉ.राठोड यांनी दिली आहे. सध्या जिल्ह्यात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. काही दिवसांपूर्वी एका ४५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला होता. सध्या जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असून वाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.