ETV Bharat / state

आता कुठे जाता ! दानवेंच्या धमकीने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दहशत - shivsena danve

दानवेंकडून होणाऱ्या त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी खोतकर यांच्या बंगल्यावर येऊन त्यांना होत असलेल्या त्रासाचा पाढाच वाचून दाखवला.

शिवसेना कार्यकर्ते
author img

By

Published : Mar 14, 2019, 1:46 PM IST

जालना - लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे निवडणूक लढवतील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये होता. त्यामुळे भोकरदन तालुक्यातील काही शिवसेना कार्यकर्त्यांनी दानवेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. मात्र, ते कार्यकर्ते आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दानवेंकडून होणाऱ्या त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी खोतकर यांच्या बंगल्यावर येऊन त्यांना होत असलेल्या त्रासाचा पाढाच वाचून दाखवला.

शिवसेना कार्यकर्ते

खासदार दानवे हे विरोधकांची कशी कोंडी करतात ते त्यांनी उघडपणे सांगितले. एकंदरीत खासदार दानवे आणि खोतकर यांच्या भांडणांमध्ये तिसऱ्याचा लाभ होणे तर सोडाच, मात्र कार्यकर्त्यांचा "कोळसा" होणार यात आता शंकेला जागा राहिली नाही. भोकरदन जाफराबाद हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात शिवसेनेने मागील वर्षभरापासून घुसखोरी करून कार्यकर्त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत खासदार दानवेच्या विरोधात काम करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खोतकर यांच्या बाजूने लढा देत दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये भांडणेही केली.

खोतकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता मावळत गेल्यामुळे १२ तारखेला कार्यकर्त्यांनी थेट खोतकरांच्या बंगल्यात ठिय्या देऊन कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याचा आग्रह केला. याच वेळी खासदार दानवे यांना 'भंगार' म्हणणाऱ्या या कार्यकर्त्यांमध्ये घबराट देखील दिसली. दानवे हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना 'भामटे' म्हणतात आणि आता कुठे जाता? अशा धमक्या देत असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रचंड दहशतीखाली असलेल्या या कार्यकर्त्यांनी खोतकर यांनी निवडणूक न लढल्यास आपण आत्महत्या करू, असा इशाराही कार्यकर्ते कैलास पुंगले यांनी दिला. तर मनीष श्रीवास्तव यांनीही शिवसेना संपविणाऱ्यांना आम्ही आता सोडणार नाहीत, अशा पद्धतीने खासदार दानवे यांना एक प्रकारचे आव्हान दिले आहे. जालना जिल्ह्यातून सर्वात जास्त घाबरलेल्या शिवसैनिकांमध्ये भोकरदन तालुक्यातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Intro:जालना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे निवडणूक लढवतील असा विश्वास कार्यकर्त्यांना होता .त्यामुळे खासदार दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी देऊन शिवसेनेचे काम करणाऱ्या भोकरदन तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते मात्र आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी खोतकर यांच्या बंगल्यावर घेऊन त्यांना होत असलेल्या त्रासाचा पाडाच सर्वांसमक्ष वाचला आणि खासदार दानवे हे विरोधकांची कशी कोंडी करतात ते उघडपणे सांगितले. एकंदरीत खासदार दानवेआणि ना.खोतकर यांच्या भांडणांमध्ये तिसऱ्याचा लाभ होणे तर सोडाच कार्यकर्त्यांचा मात्र "कोळसा "होणार यात आता शंकेला जागा राहिली नाही.

Body:भोकरदन जाफराबाद हा भाजपाचा बालेकिल्ला आहे .या बालेकिल्ल्यात शिवसेनेने मागील वर्षभरापासून घुसखोरी करून कार्यकर्त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत खासदार दानवेच्या विरोधात काम करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खोतकर यांच्या बाजूने लढा देत दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये भांडणेही ही केली. मात्र आता तिकीट मिळण्याची शक्यता मावळात गेल्यामुळे 12 तारखेला यात कार्यकर्त्यांनी खोतकर यांच्या बंगल्यात हे ठियय देऊन कुठल्याहीपरिस्थितीत खोतकरानी ही निवडणूक लढण्यासाठी आग्रह केला. याच वेळी खासदार दानवे यांना "भंगार" म्हणणाऱ्या या कार्यकर्त्यांमध्ये घबराट देखील दिसली. दानवे हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना "भामटे" म्हणतात ,आणि आता कुठे जाताल? अशा धमक्या देत असल्याचेही ही कार्यकर्त्यांनी सांगितले .
दरम्यान प्रचंड दहशतीखाली असलेल्या या कार्यकर्त्यांनी खोतकर यांनी निवडणूक न लढल्यास आपण इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या करू अशी धमकीही शिवसेनेचे कार्यकर्ते कैलास पुंगले यांनी दिली. तर मनीष श्रीवास्तव यांनीही शिवसेना संपविणाऱ्यांना आम्ही आता सोडणार नाहीत ,अशा पद्धतीने खासदार दानवे यांना एक प्रकारचे आव्हान दिले आहे .जालना जिल्ह्यातून सर्वात जास्त घाबरलेल्या शिवसैनिकांमध्ये भोकरदन तालुक्यातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.