ETV Bharat / state

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, सदस्यांचा एकत्र येऊन मतदान करण्यावर भर

जालना तहसील केंद्रावर जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिका सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत या मतदान केंद्रावर कोणीच आले नाही, त्यानंतर मतदानाचा पहिला हक्क बजावला, तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहा आलम खान यांनी.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
author img

By

Published : Aug 19, 2019, 7:44 PM IST

जालना - औरंगाबाद आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदान आज पार पडले. जालना तहसील केंद्रावर जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिका सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत या मतदान केंद्रावर कोणीच आले नाही, त्यानंतर मतदानाचा पहिला हक्क बजावला, तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहा आलम खान यांनी.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, सदस्यांचा एकत्र येऊन मतदान करण्यावर भर

त्यानंतर काही नगरसेवकांनी एक-एक करून येत मतदान केले. एकट्याने येणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांचादेखील समावेश होता. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या मतदारांनी मतदान केंद्रात प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचेही मतदार दुपारी एकच्या सुमारास मतदान केंद्रात एकत्र आले. भाजपाचे मतदान होते न होते तोच, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मतदान केले.

दुपारी दोन वाजेपर्यंत या केंद्रावरील एकूण 77 मतदारांपैकी 67 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता म्हणजेच 87 टक्के मतदान या केंद्रावर पूर्ण झाले होते.
दरम्यान, शिवसेनेच्या वतीने मतदारांना पक्षादेश काढून शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारालाच मतदान करण्याचे बंधन घालण्यात आले होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतदारांसाठी असा कोणताही आदेश काढण्यात आलेला नव्हता. एकंदरीत या मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू होते.

17 मतदान केंद्रात पार पडली निवडणूक
औरंगाबाद जिल्ह्यात 9 तर जालना जिल्ह्यात 8 असे एकूण 17 मतदान केंद्र राहणार आहेत. या केंद्रापैकी सर्वात जास्त 138 मतदान औरंगाबादच्या तहसील कार्यालयात आहे.

पक्षीय बलाबल
भाजप - 189, शिवसेना - 141, काँग्रेस - 170, राष्ट्रवादी - 80, एम.आय.एम - 28, रिपाई बसपा अपक्ष - 49
एकूण - 657

Intro:औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे साठी आज मतदान होत आहे जालना तहसील केंद्रावर जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिका सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत या मतदान केंद्रावर कोणीच आले नाही त्यानंतर पहिला हक्क बजावला तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहा आलम खान यांनी त्यानंतर काही नगरसेवकांनी एकट्याने येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला एकट्याने येणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांचा देखील समावेश होता त्यानंतर त्यांच्यापाठोपाठ भारतीय जनता पार्टीचे टीम नगरसेवक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या मतदारांनी मतदान केंद्रात प्रवेश केला त्यांचे पाठोपाठ शिवसेनेचे ही ही मतदार दुपारी एक वाजेच्या सुमारास मतदान केंद्रात एकत्र आले भाजपाचे मतदान होते न होते तोच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांनीही मतदान केंद्रात प्रवेश केला नगराध्यक्ष सौ संगीता गोरंट्याल यांच्यासह महिलांनाही येथे हे मतदानासाठी वाट पाहावी लागली दुपारी दोन वाजेपर्यंत या केंद्रावरील एकूण 77 मतदारांपैकी 67 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता म्हणजेच 87 टक्के मतदान या केंद्रावर पूर्ण झाले होते

Body:दरम्यान शिवसेनेच्या वतीने मतदारांना पक्षादेश काढून शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारालाच मतदान करण्याचे बंधन घातले होते मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांसाठी असा कोणताही आदेश काढण्यात आलेला नव्हता एकंदरीत या मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू होते

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.