ETV Bharat / state

उद्यापासून औरंगाबादच्या पोलीस महानिरीक्षकांचा तीन दिवसीय जालना दौरा - aurangabad ig three day visit to jalna

औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना हे उद्यापासून तीन दिवस जालना दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या दौऱ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

inspector-general-of-police-of-aurangabad-three-day-visit-to-jalna-from-tomorrow
उद्यापासून औरंगाबाद परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांचा तीन दिवसीय जालना दौरा
author img

By

Published : Dec 27, 2020, 10:13 PM IST

जालना - औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना हे सोमवार 28 ते 30 डिसेंबरपर्यंत तीन दिवस जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पोलीस यंत्रणेसाठी हा दौरा महत्त्वाचा असतो. त्यामध्ये पोलिसांची दप्तर तपासणी, गुन्ह्याचा आढावा घेणे, पोलिसांना शाबासकी देणे आणि त्यासोबत कामचुकार पोलिसांना घराची वाट दाखवणे हादेखील महत्त्वाचा कार्यक्रम पार पाडला जातो.

पोलीस महानिरीक्षकांचा तीन दिवसीय जालना दौरा

सुरुवात चंदनजिरा पोलीस ठाण्यापासून -

सोमवारी सकाळी दहा वाजता जालना शहरातील आणि जालना रोडवर असलेल्या चंदनजिरा पोलीस ठाण्यात त्यांचे आगमन होणार आहे. इथूनच त्यांच्या जालना जिल्ह्याच्या तपासणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अद्यावत करणे चालू आहे. शहर हद्दीत असलेल्या चारही पोलीस ठाण्यांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यापैकी कदीम जालना आणि तालुका पोलीस ठाणे हे आत्ताच स्थलांतरित झाल्यामुळे तिथे फारशी दुरुस्तीची गरज नाही. मात्र, चंदंनजिरा आणि सदर बाजार हे दोन्ही पोलीस ठाणे जुन्या इमारती असल्यामुळे स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. चंदनजिरा पोलीस ठाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेवर आहे. त्यामुळे तिथे भव्य पटांगण आहे. वर्षानुवर्ष अस्ताव्यस्त पडलेली वाहने, जप्त केलेली वाहने, भंगार गाड्या आणि छोटीशी इमारत त्यामुळे या इमारतीत बसणे हे अवघड झाले होते. मात्र, आता स्वच्छता आणि रंगरंगोटी केल्यामुळे ही सुंदर आणि देखणी इमारत पोलिसांच्या कार्यक्षमतेमध्ये निश्चितच भर टाकणारी आहे.

महानिरीक्षकांच्या दौऱ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज -

अशीच अवस्था सदर बाजार पोलिस ठाण्यात होती. वर्षानुवर्षे चोरीची जप्त केलेली वाहने, पोलिसांनी अपघातांमध्ये पकडून आणली दुचाकी वाहने, अशा वाहनांनी पोलीस ठाण्याची मागची बाजू गच्च भरली होती. पावसामध्ये ही वाहने सडत होती. तसेच ठाण्यामध्ये इतर वाहने लावायलाही जागा नव्हती. मात्र, या सर्व जुन्या भंगार वाहनांना शहर वाहतूक शाखेच्या मैदानात आणून टाकल्यामुळे आता सदर बाजार पोलीस ठाण्यात मोकळी जागा झाली आहे. इथेही रंगरंगोटी करून अधिकाऱ्यांच्या दालनाला नावाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे ठाणे देखील सुंदर दिसायला लागले आहे. पोलीस मुख्यालयाच्या रंगरंगोटी व स्वतः गृह विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अभय देशपांडे हे पाहणी करीत आहेत. तसेच तालुका आणि कदीम जालना पोलीस ठाण्याला फारशी दुरुस्तीची गरज नाही. मात्र, तालुका पोलीस ठाण्यांमध्ये शस्त्रास्त्रांची स्वच्छता हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला गेला आहे. इथेदेखील भंगार गाड्यांची जागा स्वच्छ करण्यात आली आहे. एकंदरितच उद्यापासून जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेल्या पोलीस महानिरीक्षकांसाठी सर्व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

हेही वाचा - संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - अतुल भातखळकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.