ETV Bharat / state

महिलेवर चाकू हल्ला; पोत्यात भरून सोडले वाहत्या कालव्यात - जालना गुन्हे वृत्त

लिलाबाई राठोड, अंकूश राठोड आणि त्यांचा मुलगा रवी राठोड यांनी महिलेस मारहाण करून मोबाईल सोने व पैसे लुटले. तसेच त्या महिलेवर चाकूचे वार करून तिला जखमी अवस्थेत पोत्यात भरून कालव्यातील पाण्यात फेकून दिले'

पोत्यात भरून सोडले वाहत्या कालव्यात
10237170पोत्यात भरून सोडले वाहत्या कालव्यात
author img

By

Published : Jan 14, 2021, 12:34 PM IST

जालना - महिलेवर चाकूचे वार करून वडीगोद्री येथील डाव्या कालव्यात फेकून दिले होते. मात्र, त्या महिलेने कालव्याच्या पाण्यातून बाहेर पडत स्वत:चा जीव वाचवला आहे. बुधवारी रात्री १०:३० च्या सुमारास घडली. सुशिला विश्वास राठोड असे या महिलेचे नाव असून ती बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख येथील रहिवासी आहे.

वडीगोद्रीच्या ग्रामस्थांनी रुग्णालयात केले दाखल-

वडीग्रोदी येथील डाव्या कालव्याच्या पाण्यातून एक महिला जखमी अवस्थेत बाहेर पडल्याचे तेथील स्थानिक नागरिकांनी पाहिले. त्यानंतर ग्रामस्थांनी तिला वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले. तिच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील जावळे यांनी प्राथमिक उपचार केले. या महिलेच्या गळ्याला कमरेला, तोंडावर व पाठीवर चाकूचे वार होते ती गंभीररीत्या जखमी झाली होती.

महिलेवर चाकू हल्ला; पोत्यात भरून सोडले वाहत्या कालव्यात

पैसे घेण्यासाठी आल्यावर जीवे मारण्याच प्रयत्न-

जखमी अवस्थेतील महिलेस अधिक विचारपूस केली असता, ती म्हणाली की 'मी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख येथील आहे. माझे लिलाबाई अंकुश राठोड, अंकुश राठोड दूनगाव तांडा यांच्याकडे पैसे होते, ते पैसे देतो म्हणाले म्हणून मी आले होते. मात्र, लिलाबाई राठोड, अंकूश राठोड आणि त्यांचा मुलगा रवी राठोड यांनी मला मारहाण करून मोबाईल सोने व पैसे घेतले. तसेच माझ्यावर चाकूचे वार करून पोत्यात भरून कालव्यातील पाण्यात फेकून दिले'

पाण्यात फेकून दिल्यानंतर जखमी अवस्थेतीतील सुशिला राठोड यांनी कसाबसा स्वत:चा जीव वाचवला. या प्रकरणी गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती देताच. गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक हनुमंत वारे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या जखमी महिलेला औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.