ETV Bharat / state

राज्यभरात राबवण्यात येणारा लिक्विड ऑक्सिजनचा 'जालना पॅटर्न' म्हणजे नेमकं काय, जाणून घ्या - लिक्विड ऑक्सिजन प्लांट जालना बातमी

कोरोनाबाधित रुग्णांच्या व्हेंटिलेटरसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनसाठी जालन्यात सीएसआरमधून मराठवाड्यातील सर्वात मोठा 'लिक्विड ऑक्सिजन' प्लांट उभारण्यात आला आहे. या प्लांटमध्ये टँकरच्या माध्यमातून लिक्विड ऑक्सिजन आणून त्याचा साठा केला जातो आणि या द्रवाचे नंतर गॅसमध्ये रुपांतर करून रुग्णांना उपलब्ध करून दिले जाते.

लिक्विड प्लांट पॅटर्न
लिक्विड प्लांट पॅटर्न
author img

By

Published : Sep 13, 2020, 1:51 PM IST

जालना : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना पॅटर्न राज्यभरात राबविण्याचे सूतोवाच केले आहे. नेमकं काय आहे हा जालना पॅटर्न, 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून जाणून घ्या.

लिक्विड ऑक्सिजनचा 'जालना पॅटर्न'

कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये म्हणून जालन्यामध्ये राज्यातील पहिला लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात आला आहे. 20 हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन साठा करून तो नंतर गॅसच्या स्वरुपात परावर्तित करून रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे लिक्विड ऑक्सिजन प्लांट. जालना रुग्णालयाच्या परिसरात महिनाभरापूर्वी या लिक्विड ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली. या प्लांटची उभारणी केल्यामुळे सुमारे शंभर रुग्णांना 24 तास ऑक्सिजन पुरवठा होऊ शकेल, अशी सुविधा निर्माण झाली आहे.

यापूर्वी ऑक्सिजन सिलिंडरच्या माध्यमातून हा पुरवठा केल्या जायचा. मात्र, त्याचा दाब आवश्यक तेवढा मिळत नव्हता आणि पुरवठादेखील वेळेवर होत नव्हता. मात्र, या प्लांटमुळे तो योग्य प्रमाणात मिळणार आहे. या प्लांटमध्ये टँकरच्या माध्यमातून लिक्विड ऑक्सिजन आणून त्याचा साठा केला जातो आणि या द्रवाचे नंतर गॅसमध्ये रुपांतर करून रुग्णांना उपलब्ध करून दिले जाते.

कोविड-19 या रुग्णालयात यापूर्वी 40 आयसीयू खाटा होत्या. आता आणखी 40 नवीन खाटा तयार झाल्या आहेत. त्यामुळे आता एकाचवेळी 80 रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकेल. हे 80 रुग्ण आणि त्यासह आवश्यकता पडल्यास इतर काही रुग्ण अशा एकूण शंभर रुग्णांना 24 तास आणि आठ दिवस पुरेल एवढा अक्सिजनचा साठा या लिक्विड ऑक्सिजन प्लांटमध्ये केला जातो. या प्लांटमुळे रुग्णांचा मृत्यूदर कमी होईल, असा दावा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी केला आहे. त्यामुळे जालन्यात उभारलेला हा पहिला लिक्विड ऑक्सिजन प्लांट, राज्यातील ज्या रुग्णालयांमध्ये 200पेक्षा जास्त खाटा आहेत, त्या सर्व रुग्णालयात सुरू करण्याचे सूतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

हेही वाचा - जालना : जायकवाडीच्या डाव्या कालव्यावरील ५० वर्षे जुना पूल कोसळला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.