जालना जालना येथे ( Jalna District ) आयकर विभागाने आज छापा टाकला. आयकर विभागाने स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरे-कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने ( Income Tax department ) टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी ( Unaccounted Assets Rs 390 crores ) मालमत्ता उघडकीस आली आहे. त्यात ५८ काेटींची राेकड, ३२ किलाे साेन्याचे दागिने ( 32 Kilos of Military Jewellery ), हिरे, माेती असा १६ काेटींचा ऐवज तसेच सुमारे ३०० काेटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला.
पश्चिम बंगालमधल्या धाडीची आठवण करून देणारा छापा पश्चिम बंगालमधल्या ईडीच्या धाडीत सापडलेल्या नोटांच्या ढिगाऱ्याची आठवण करून देणारी कारवाई जालन्यात झालीय. जालना इथल्या स्टील कारखानदारांच्या कारखाना आणि घर-कार्यालयावर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आलीय. त्यात ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल १३ तास लागले. १ ते ८ ऑगस्ट अशा आठ दिवस चाललेल्या कारवाईत राज्यभरातले २६० अधिकारी, कर्मचारी १२० वाहनांतून जालन्यात पोहोचले होते. कारवाईत सापडलेली ५८ कोटींची रोकड ३५ कापडी पिशव्यांत पॅक करण्यात आली तेव्हा नोंटांच्या बंडलांच्या भिंतीच उभ्या राहिल्या. या कारवाईत औरंगाबादमधील एक प्रख्यात लॅड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.
जालन्यात सापडली बेहिशोबी मालमत्ता जालन्यात 3 ऑगस्ट रोजी दिवसांपूर्वी आयकर विभागाने टाकलेल्या छापेमारीत 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोने अशी एकूण 390 कोटींची बहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागली आहे. आयकर विभागाच्या 300 अधिकाऱ्यांनी जालन्यातील स्टील उद्योग आणि बांधकाम व्यावसायिकांच्या मालमत्तेवर 5 दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यानी स्टील उद्योजकांच्या कंपन्यांसह घरावर छापे टाकले होते. या छापेमारीतच काही दस्तावेज 32 किलो सोने, 58 कोटी रुपयांची रोख रक्कम अशी एकूण 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे.