जालना - आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबई-पुण्यातही संख्या कमी होत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल. आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope On Third Wave ) यांनी दिलीय. ते जालन्यात बोलत होते.
मार्चमध्ये तिसरी लाट संपेल -
मुंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. याच आधारावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तिसरी लाट संपेल ( Health minister on corona ) असे सांगितलेय.
पहिल्या डोसचे 92 टक्के लसीकरण -
सध्या राज्यात राज्य शासनाकडून लावण्यात आलेले निर्बंध टप्प्या-टप्प्याने कमी येईल असेही टोपे म्हणाले. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मार्च अखेरीस खूप कमी होईल. कोव्हक्सिनचा राज्यात काही प्रमाणात तुटवडा आहे. तुटवडा पडू नये म्हणून केंद्राने काळजी घेण्याची गरज आहे. राज्यात पहिल्या डोसचे 92 टक्के लसीकरण झाले असून 55 ते 60 टक्के दुसऱ्या डोसचं लसीकरण झाले आहे, अशी माहितीही टोपे यांनी दिली.
12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना लसीकरण -
12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना ICMR सांगेल तेव्हा लसीकरण सुरू केले जाईल. जगात लहान मुलांपासून सर्वांना लसीकरण करण्यात येते. या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय घ्यावा त्याची राज्य सरकार अंमलबजावणी करेल असेही टोपे यांनी सांगितले. राज्यात काही कोरोना रुग्णांमध्ये ब्रेन स्टोन आढळून येत असल्याच समोर आले. याबाबत निष्कर्षाअंतीच बोलता येईल असंही त्यांनी सांगितले.