ETV Bharat / state

मतदार यादीच्या माध्यमातून ज्येष्ठांचा शोध घेत आरोग्य तपासणी करणार - जिल्हाधिकारी

कोरोनाला आळा घालण्यासाठी जालना प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, रुग्णांचा आकडा वाढत आहे. व्यापाऱ्यांनी तीन दिवस बंद पाळून चांगले काम केले असले तरिही या आजाराला आळा बसत नाही. त्यामुळे आता जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.

Health check-up will be done by searching for seniors through voter list
मतदार यादीच्या माध्यमातून ज्येष्ठांचा शोध घेत आरोग्य तपासणी करणार
author img

By

Published : Jun 22, 2020, 8:13 PM IST

जालना - आतापर्यंतच्या अहवालानुसार कोरोनाची बाधा होणाऱ्या रुग्णांमध्ये ज्येष्ठ रुग्णांचा अधिक समावेश आहे. त्यातही मधूमेह, दमा, अस्थमा, रक्तदाब, असे आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाचा सर्वाधिक त्रास जाणवतो. त्यामुळे आता जालना जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे जात, मतदार यादीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना शोधून काढण्याचे आणि त्यांची तपासणी करण्याचे ठरवले आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोनाविषयी जनजागृती करणाऱ्या एका ध्वनीचित्रफितीचे अनावरण यावेळी करण्यात आले.

जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... आजारी मुलासमोरच महिलेची केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहांमध्ये जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, जिल्हा नियोजन आणि विकास अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा निबंधक नारायण चव्हाण, एनआयसीचे रवींद्र पडूळकर आदींची उपस्थिती होती.

कोरोना या आजाराला आळा घालण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, रुग्णांचा आकडा वाढत आहे. व्यापाऱ्यांनी देखील तीन दिवस बंद पाळून चांगले काम केले. मात्र, या आजाराला आळा बसत नाही. त्यामुळे आता जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अन्य नागरिकांनी देखील वेळच्या वेळी घरी 'पल्स ऑक्सी मीटर' ठेवून त्याचा नियमित वापर करावा आणि स्वतःची काळजी घ्यावी. या यंत्रामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कळते, असे जिल्हाधिकारी बिनवडे यांनी सांगितले.

हेही वाचा... गोव्यात कोरोनाचा पहिला बळी; आरोग्य विभाग करणार अंत्यसंस्कार..

कोरोनाच्या जनजागृतीसाठी आजपर्यंत जालना जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रयोग करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आज पत्रकार परिषदेत एका टेलिफिल्मचा (ध्वनी चित्रफित) शुभारंभ करण्यात आला. या माध्यमातून कोरोना का पसरत आहे आणि त्यावर काय उपाय आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याच पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रलंबित कापसासंदर्भात, जिल्हा नियोजन आणि विकास आराखड्यातील आमदारांनी दिलेल्या निधी संदर्भात देखील माहिती देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.