जालना - आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमिताने भोकरदन तालुक्यात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यात तसेच वाड्या वस्त्यांवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना (आज) रविवारी 6 डिसेंबर रोजी अभिवादन करण्यात आले.
सिल्लोड रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन -
भोकरदन शहरात सकाळी रमाई नगरातील अशोका बुद्ध विहारात सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच प. पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने सिल्लोड रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला समितीचे सचिन पारखे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भीम आर्मी व इतर संघटनांच्या वतीने अनिल पगारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी देखील अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमास नगरसेवक दिपक बोर्डे, नगरसेविका निर्मला ताई भिसे, नगरसेवक कदिर बापू, शामराव दांडगे, अॅड. डी एस जाधव, यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनामुळे नागपुरात यंदा मोजकीच गर्दी -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंची गर्दी दीक्षाभूमीवर उसळत असते. परंतु, यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच अनुयायींच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. चैत्यभूमी प्रमाणेच दीक्षाभूमीला अनुयायींची गर्दी असते. महाराष्ट्रच नाही तर, इतरही राज्यातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. परंतु यंदा काही ठराविक लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा- महापरिनिर्वाण दिन : मेणबत्त्यांच्या रोषणाईने झगमगला चवदार तळे परिसर
हेही वाचा- महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'आरपीआय'कडून मास्क अन सॅनिटायझरचे वाटप