जालना - स्वच्छतेवर भर दिला पाहिजे, राहणीमानातील असो खान पानातील असो किंवा राजकारणातील असो असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी आज (बुधवारी) केले. अन्नमृत फाउंडेशनच्या केंद्रीय स्वयंपाक गृहाचा लोकार्पण सोहळा राज्यपालांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधता त्यांनी हे आवाहन केले.
हेही वाचा - कोरोनाचा परिणाम; चीनला होणारी कापूस निर्यात ठप्प; शेतकरी संकटात
शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन पुरविणाऱ्या या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या वेळी राधाकृष्ण दास, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, डॉ राजेंद्र बारवाले, यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मुकेश अग्रवाल, अनिल टेकाळे, सुनील रायठठ्ठा, अनया अग्रवाल, सुदर्शन पोटभरे, गणेश नखाते, आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - 'काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर करत आहे'