ETV Bharat / state

कृषी सिंचन घोटाळा पहिल्या टप्प्यात 96 घोटाळ्यांमध्ये 94 लाखांची शासनाची फसवणूक उघड

जालना जिल्ह्यात युती सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. आणि हा घोटाळा स्वतः विद्यमान कृषी मंत्री दादा भुसे यांनी उघड केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीने आता वेग घेतला असून स्वतः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे हेदेखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या सिंचन घोटाळ्याची चौकशी करीत आहेत.

जालना कृषी सिंचन घोटाळा न्यूज
जालना कृषी सिंचन घोटाळा न्यूज
author img

By

Published : Dec 4, 2020, 4:57 PM IST

जालना - जालना जिल्ह्यात युती सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. आणि हा घोटाळा स्वतः विद्यमान कृषी मंत्री दादा भुसे यांनी उघड केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीने आता वेग घेतला असून स्वतः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे हेदेखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या सिंचन घोटाळ्याची चौकशी करीत आहेत.

घोटाळा उघड करण्यासाठी कृषिमंत्र्यांच्या पुढाकार

शासकीय योजनांमध्ये झालेले भ्रष्टाचार आणि घोटाळे दाबून टाकण्यासाठी अधिकारी आणि पुढारी यांचा पुढाकार असतो, मात्र कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्वतः दिनांक अकरा नोव्हेंबरला माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी रात्री दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन जालना जिल्ह्यात झालेल्या कृषी सिंचन घोटाळ्यातील प्रकरणांची माहिती दिली. संगणकाच्या साह्याने फोटोमध्ये फेरफार करून 1172 घोटाळे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आणि याची शहानिशा देखील करणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान या घोटाळ्यांमध्ये सहभागी असलेल्या शेती साहित्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द केले असल्याचे ते म्हणाले.

जालना कृषी सिंचन घोटाळा

हेही वाचा - पोलीस उपनिरीक्षकांनी केलेल्या रक्तदानामुळे वाचले अपघातग्रस्ताचे प्राण, गृहमंत्र्यांकडूनही कौतुकाची थाप

शासनाची फसवणूक

दरम्यान या सिंचन घोटाळ्याची चौकशी आता सुरू झाली आहे. जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यामध्ये 96 प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांनी सातबारा खोट्या लावणे ,तलाठ्याचे खोटी सही शिक्के वापरणे, आणि त्याला प्रोत्साहन म्हणून किंवा जाय मोक्याची तपासणी न करता खोटी बिले काढणे अशी 96 प्रकरणे बोगस निघाले आहेत .या प्रकरणातून 94 लाख रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचेही ही निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे या सर्व कामांची तपासणी करून अहवाल देणाऱ्या कृषी पर्यवेक्षक दिलीप तरळ यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहितीही ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

भोकरदन जाफराबादमध्ये सर्वात जास्त घोटाळा

जालना जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये सर्वात जास्त घोटाळे झाले असल्याचे समोर आले आहे .दरम्यान हे घोटाळे राजकीय दबावामुळे झाले की काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे . कारण या विषयीची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी दिली आणि भोकरदन जाफराबाद या दोन्ही तालुक्यावर केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे आणि त्यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांचे वर्चस्व आहे. आणि आता दानवे विरुद्ध खोतकर असा संघर्ष उघड सुरू झाला आहे.

अंतिम मुदत नाही

या घोटाळ्याची चौकशी किती दिवसात पूर्ण होईल याबाबतीत मात्र कृषी मंत्री दादा भुसे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे या दोघांनीही ही अंतिम मुदत सांगितली नाही. चौकशी चालू आहे आणि घोटाळे समोर येत आहे त्यामुळे लवकरच ही चौकशी पूर्ण करू एवढीच माहिती दोघांनीही दिली आहे

हेही वाचा - बच्चू कडूंनी कंबर कसली ; आज मोझरीतून हजारो शेतकरी राजधानीकडे होणार रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.