जालना - जालन्यातील 'मंठा सहकारी बँकेतील 28 हजार 536 खातेदारांना विम्याची रक्कम मंजूर झाली. यामध्ये 27 हजार 534 खातेदाराच्या खात्यात सुमारे 37 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. दरम्यान, हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शक्य झाले आहे. ( Mantha Cooperative Bank ) मोदींनी गरिबाच्यापोटी जन्म घेतला म्हणून त्यांना गरिबांची जाण आहे. तुमचे बुडालेले पैसे मिळाल्याबद्दल घरी जाताच शेजाऱ्यांना आणि मित्र मंडळींना चहा पाजून मोदींचे आभार माना असा सल्ला दानवे यांनी उपस्थित खातेदारांना दिला आहे.
दानवेंनी त्यांच्या खास शैलीत भाषण केले
ते दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना जिल्ह्यातील अर्जून जाधव व सत्यभामा जाधव या ठेवीदारांना विम्याच्या धनादेशाचे यावेळी वितरण करण्यात आले. तर, जालन्यात केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते ठेवीदारांना प्रतिनिधिक स्वरूपात धनादेश देण्यात आले. या कार्यक्रमात दानवेंनी त्यांच्या खास शैलीत भाषण केले.
हेही वाचा - Mehagai Hatao Rally : आम्हाला हिंदुत्ववाद्यांना घालवून, हिंदूंचं राज्य आणायचंय - राहुल गांधी