ETV Bharat / state

बदनापूर तालुक्यात गारपीट, फळपिकांचे नुकसान

author img

By

Published : May 10, 2020, 8:58 PM IST

सिंचनाची सोय या पावसामुळे झालेली होती, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबागावर लक्ष केंद्रित केले होते. परंतु या गारपिटीमुळे या फळपीकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र आहे.

बदनापूर तालुक्यात गारपीट, फळपिकांचे नुकसान
बदनापूर तालुक्यात गारपीट, फळपिकांचे नुकसान

जालना - बदनापूर तालुक्यातील विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यासोबत अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्याच्या आंबा, मोसंबी, केळी, टरबूज, खरबूज या फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते तर जोरदार वाऱ्यामुळे कित्येक ठिकाणचे घरावरील पत्रे उडून गेली, तर विद्युत पुरवठाही दुपारपासून बंद झालेला होता. रविवारी दुपारपर्यंत कडक ऊन पडलेले असताना दुपारी दोननंतर अचानक वातावरणात बदल होऊन दुपारी अडीचपासून बदनापूरसह तालुक्यातील भराडखेडा, अकोला, पाडळी, गोकुळवाडी, गेवराई, सोमठाणा, धोपटेश्वर, सगरवाडी आदी ठिकाणी जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्यामुळे परीसरातील झाडे काही ठीकानी पडली तर घरावरचे व शेतीतील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. जोरदार वाऱ्याबरोबरच गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्याच्या फळबागांचे ही मोठे नुकसान झाले. दरम्यान, वाऱ्यामुळे तालुक्यातील विद्युत पुरवठाही उशिरापर्यंत बंदच होता.

बदनापूर तालुक्यात मागील चार वर्षांपासून सलग दुष्काळी परिस्थिती होती. अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांचया उत्पादनात कमालीची घट झालेली आहे. यंदाही खरीप हंगामात अत्यल्प पावसाने खरीप उत्पादन म्हणावे तसे झालेले नव्हते. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 या महिन्यांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आशा निर्माण झालेल्या होत्या. सिंचनाची सोय या पावसामुळे झालेली होती, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबागावर लक्ष केंद्रित केले होते. परंतु या गारपिटीमुळे या फळपीकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र आहे. तालुक्यात कित्येक ठिकाणी जवळपास अर्धा तास बोराच्या आकाराच्या तर काही ठिकाणी त्यापेक्षा मोठया गारा बसरल्या. त्यामुळे सोमठाणा शिवारात असलेल्या खरबूज व टरबुज या फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले तर केळी, आंबा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील गोकुळवाडी येथील अनिल दादाराव कोलते या प्रगतशील शेतकऱ्याने नवीन प्रयोग म्हणून केळी लागवड केलेली होती. यावर्षी केळीचे घड चांगले आलेले असून मोठे उत्पादन अपेक्षित होते पण आजच्या गारपिटीमुळे या पिकांचे नुकसान झाले असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे येथील मोसंबी उत्पादक बळीराम निवृत्ती भडांगे यांच्याही मोसंबी पिकाला प्रचंड फटका बसलेला असून मोठ्या प्रमाणात फळे गळून पडलेली दिसून आली. गारपीटीमुळे प्रचंड नुकसान झालेले असल्यामुळे आता उमेदच हरल्यासारखी परिस्थिती असल्याचे यावेळी शेतकरी म्हणत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.