जालना - जिल्ह्यात पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कामाला लागले आहे. जिल्ह्यातील 47 गावांना नदीच्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामध्ये गोदावरी आणि गंगा नदीमुळे 39 गावांना तर पूर्णा नदी मुळे आठ गावांना याचा धोका आहे.
जालना जिल्ह्यातील 47 गावांना पुराचा धोका गोदावरीमुळे 39 गावांना धोकागोदावरी गंगेवर पैठण येथे बांधलेले संत एकनाथ जलाशय जर पूर्ण क्षमतेने भरून वाहिले तरच गोदाकाठच्या गावांना या पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. सुमारे शंभर किलोमीटर गोदाकाठ जालना जिल्ह्यात आहे. त्यामध्ये अंबड ,घनसावंगी या तालुक्यातील गावांचा समावेश आहे. गोदावरी सोबतच मंठा तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीमुळेदेखील काही गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. गोदावरीमुळे घनसांगी तालुक्यातील 18 गावांना, अंबड तालुक्यातील १६ गावांना आणि परतूर तालुक्यातील पाच गावांना पुराचा धोका आहे. पूर्णा नदीमुळे मंठा तालुक्यातील तीन गावांना धोका आहे तर उर्वरित हे भोकरदन आणि जाफराबादमधील विविध नद्यांच्या पुरामुळे धोका निर्माण होणाऱ्या गावांचा समावेश आहे.
मागील दहा वर्षांच्या पावसाची सरासरीजालना जिल्ह्यामध्ये मागील दहा वर्षांमध्ये सर्वात जास्त पाऊस 2020 मध्ये 157 मिलिमीटर पडला होता .2013 मध्ये 116 मिलिमीटर, 2016 मध्ये 113 मिलिमीटर.2019 मध्ये 112 मिलिमीटर.2017 मध्ये 98 मिलिमीटर.2011 मध्ये 84 मिलिमीटर .2018 मध्ये 61 मिलिमीटर .2014 मध्ये 54 मिलिमीटर ,तर सर्वात कमी पाऊस 2012मध्ये 44 मिलिमीटर एवढा झाला होता. मागील दहा वर्षात सरासरी 688 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापनाची तयारी आपत्ती व्यवस्थापनाकडे दहा ते बारा व्यक्ती वाहून नेणाऱ्या चार बोट होत्या. त्यामध्ये वाढ होऊन यावर्षी त्या 5 करण्यात आल्या आहेत. फायबर ची एक बोट आहे आणि ती सध्या जालना येथील अग्निशमन दलाच्या ताब्यात देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनात कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दोन तात्पुरते तंबूही आहेत. त्या सबत पुराव्यतिरिक्त कुठे झाडे पडली, रस्ते बंद झाले तर ते कापण्यासाठी अत्याधुनिक कट्टरदेखील आहेत. जखमींना वाहून नेण्यासाठी दहा स्ट्रेचर आहेत. रात्रीच्या वेळी काम करण्यासाठी जालना नगरपालिकेसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि तालुक्याच्या ठिकाणी प्रकाश यंत्रणा देण्यात आलेली आहे. ऑक्सिजन सिलेंडर, बॅटरी सेफ्टी हेल्मेट, फायर सूट ही सर्व यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनाने सज्ज ठेवलेली आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आठ दिवसांपूर्वीच आपत्ती व्यवस्थापन संदर्भात बैठक घेऊन सर्व यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.